आगामी ICC T20 World स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; या खेळाडूंना मिळाले संघात स्थान तर अनुभवी खेळाडू संघाबाहेर...

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाला (Indian team) हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. आता येत्या काही दिवसात आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (Bcci) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा गोलंदाज अर्शदीप सिंगला स्थान देण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचे संघात पुनरागमन झाले आहे.

संघाची घोषणा करताना बीसीसीआयने काही धाडसी निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे क्रिकेट चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला देखील या संघात स्थान देण्यात आले नाहीये. या खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाजांना संधी...

बीसीसीआयने आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात ४ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. या ४ गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंगचा समावेश आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल, आर अश्विन आणि अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे. रवींद्र जडेजाला देखील या संघात स्थान दिले गेले असते. मात्र तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.

कार्तिक आणि पंत दोघेही संघात...

आगामी आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत दोघांनाही संधी देण्यात आली आहे. तसेच दीपक हुड्डाला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. तर केएल राहुल उप कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहे.

टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

 रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल , अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

 राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चाहर.

काय वाटतं? बीसीसीआयने मोहम्मद शमीला संघाबाहेर ठेवून योग्य निर्णय घेतला आहे का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required