computer

कॉमेंट्री करताना खुद्द कॉमेंट्रेटर्सना रडू येते असं कधी होताना पाह्यलंय??

ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी समाधानकारक होत नसली तरी भारतीय हॉकी संघाने घडवलेला इतिहास देशवासियांना खुश करून गेला आहे. तब्बल ४९ वर्षांनंतर भारतीय संघाने ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

काही लोकांना या क्षणाचे लाइव्ह साक्षीदार होता आले. टीव्हीसमोर बसलेल्या लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता.  भारतीय पुरुष हॉकी संघाने इंग्लंडच्या संघाला ३-१ अशी धूळ चारल्यावर देशात आनंद होणे साहजिक असले तरी या निमित्ताने दोन लोकांच्या आनंदाचे मात्र विशेष कौतुक होत आहे. हे दोन लोक आहेत, सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडे.

सामना सुरू असताना कॉमेंट्रीबॉक्समध्ये बसून हे दोघे कॉमेंट्री करत होते. भारतीय संघ विजयी झाला तसा या दोघांचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. इतके वर्ष बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या अगदी जवळ आपला संघ पोहोचला आहे, याचा तो आनंद होता.

ज्या पद्धतीने इतकी मोठी मजल मारणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचे कौतुक होत आहे, तसेच कौतुक हे या दोन्ही कॉमेंटेटर्सचे देखील होत आहे. कालपासून त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे. अनेकांनी भन्नाट शब्दात त्यांचे कौतुक केले आहे. देशाबद्दलचे प्रेम हे कुठेही असलो तरी रोखून ठेवता येत नाही हेच यातून दिसून येते.

ताजी बातमी: आज सकाळी झालेल्या सेमिफायनल सामन्यात  बेल्जियमने भारताला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required