computer

या खेळाडूने अर्ध्या सामन्यात देश बदलण्याचा निर्णय घेतला, वाचा दोन देशांकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची कथा

टी ट्वेन्टी वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. याच मालिकेतील आयर्लंड आणि नेदरलँड यांच्यात झालेला तिसरा सामना चित्तथरारक ठरला. नेदरलँड बॅटिंग करत असताना कर्टीस कॅम्फर या आयरिश खेळाडूची आधीच्या ओव्हरमध्ये चांगली धुलाई झाली. पण हा पठ्ठया दुसऱ्यांदा बॉलिंगला आला तेव्हा त्याने इतिहास घडवला.

ओव्हरच्या पहिलाच बॉल त्याने वाईड टाकला. मात्र पुढील तीन बॉल्सवर त्याने एकामागे एक तीन विकेट घेत हॅट्रिक घेतली. याआधी टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये हॅट्रिक घेण्याचा मान फक्त ब्रेटलीकडे होता. पण हा भाऊ इथेच थांबणारा नव्हता. त्याने चौथ्या बॉलवर चौथी विकेट घेतली. 

रातोरात कर्टीस स्टार झाला आहे. त्याच्याकडे भविष्यातील मोठा चेहरा म्हणून बघितले जाऊ लागले आहे. पण त्याचा इतिहास मात्र भन्नाट आहे. आज त्याने आयर्लंडसाठी जबरा बॉलिंग केली असली तरी तो कधीकाळी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळत होता. 

कर्टीस जन्म जरी दक्षिण आफ्रिकेचा असला तरी त्याची आजी आयर्लंडची होती. याच कारणाने त्याच्याकडे आयर्लंडचा पासपोर्ट होता. २०१८ साली दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडविरुद्ध एक सराव सामना खेळला होता. यावेळी कर्टीस आयर्लंडचा कॅप्टन निल ओब्रायनसमोर बॉलिंग करत होता.

त्यावेळी कर्टीस गम्मत करत आपल्याकडे आयरिश पासपोर्ट असल्याचे निलला सांगितले. पण या भावाची कामगिरी बघून निल चांगलाच प्रभावीत झाला होता. त्याने थेट कर्टीसला आयर्लंडकडून खेळण्याची ऑफर देऊन टाकली. कर्टीसला पण मायदेशाकडून खेळण्याची ईच्छा होतीच, त्याने हि संधी सोडली नाही.

मिळालेल्या संधीचे सोने कर्टीस आता टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये केले आहे. एका पाठोपाठ एक असे चार विकेट घेत त्याने आपण लंबी रेस का घोडा आहोत हे सिद्ध केले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required