वनडे क्रिकेटला केव्हा आणि कधी झाली सुरुवात? वाचा वनडे क्रिकेटचा इतिहास...

क्रिकेट इतिहासात ५ जानेवारी या दिवसाला विशेष महत्व आहे. आजच्याच दिवशी वनडे क्रिकेटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली होती. आजच्याच दिवशी १९७१ मध्ये पहिला वनडे सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. हा सामना आधीपासूनच ठरवून खेळवण्यात आला नव्हता. तर परिस्थिती निर्माण झाल्याने हा सामना छोट्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता. वनडे क्रिकेट सामना हा ५०-५० षटकांचा असतो. मात्र पहिला वनडे सामना हा ४०-४० षटकांचा खेळवण्यात आला होता.(First odi match)

क्रिकेटमधील पहिला सामना हा १८७७ रोजी पार पडला होता. तर वनडे फॉरमॅटची सुरुवात व्हायला १०० वर्षांचा कालावधी लागला. वनडे क्रिकेटची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांपासून झाली. हा ऐतिहासिक सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला होता.

४० -४० षटकांचा रंगला पहिला वनडे सामना....

तर झाले असे की, १९७०-७१ दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ७ कसोटी सामन्यांची ॲशेस मालिका सुरू होती. मात्र मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आयोजकांना तिकिटांचे पैसे परत करण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी वनडे सामना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना ४०-४० षटकांचा होता. तर एका षटकात गोलंदाजाला ८ चेंडू टाकावे लागले होते.

ऑस्ट्रेलियाने मिळवला होता विजय..

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बिल लॉरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ३९.४ षटकात १९० धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाकडून धावांचा पाठलाग करताना जॉन एड्रिकने ११९ चेंडूंमध्ये ८२ धावांची खेळी केली होती. तर इयान चॅपलने ६० धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावे केला होता. 

भारतीय संघाने १९७४ मध्ये पहिला वनडे सामना खेळला होता. हा सामना भारत विरुध्द इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required