पाच वर्षानंतर मिळाली 'ओपनिंग फलंदाजी', विस्फोटक फलंदाजीने बदलून टाकली ओपनिंग फलंदाजीची व्याख्या...

मॉडर्न डे क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाला आक्रमक सुरुवात करून देणारी सलामी जोडी हवी आहे. कारण सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली की, मागचे फलंदाज येऊन मोठी धावसंख्या उभारू शकतात. हे तितकच खरं देखील आहे. मात्र यापूर्वी सलामीवीर फलंदाजांची व्याख्या काहीशी वेगळी होती. सलामीवीर फलंदाज म्हणजे, नवीन चेंडूची शाईन घालवण्याचे काम करणारे फलंदाज. मात्र श्रीलंका संघाने आपल्या संघात एक महत्वाचा बदल केला ज्याने, सलामीवीर फलंदाजीची व्याख्या बदलून टाकली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रोमेश कालुवितरना आहे.

आजच्याच दिवशी म्हणजेच ९ जानेवारी १९९६ रोजी रोमेश कालुवितरना पहिल्यांदा सलामी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यानंतर रोमेशने असे काही केले, जे पाहून प्रत्येक संघाला रोमेश सारखा सलामीवीर फलंदाज हवा हवासा वाटू लागला होता. श्रीलंकेच्या कर्णधाराने सनाथ जयसुर्यासोबत रोमेश कालुवितरनाला पहिल्यांदा सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या या सामन्यात रोमेशने तुफानी फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. तो आक्रमक फलंदाजीसह उत्तम यष्टीरक्षण देखील करायचा.

पदार्पणाच्या वर्षानंतर मिळाली सलामीला जाण्याची संधी...

रोमेशने आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना १९९० रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळला होता. मात्र तेव्हा तो मधल्या फळीत नाहीतर खालच्या फळीत फलंदाजीला यायचा. मात्र १९९६ मध्ये त्याला पहिल्यांदा सलामीला जाण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचा लाभ घेत गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. त्यावेळी त्याने ७५ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने १२ चौकार मारले होते. त्याने या धावा १०२.६६ च्या स्ट्राइक रेटने केल्या होत्या. त्यावेळी हा स्ट्राइक रेट चांगला मानला जायचा.

रोमेशला विस्फोटक फलंदाज का म्हटलं जायचं? याच साधं सोपं उत्तर म्हणजे, तो पावरप्लेचा योग्य वापर करायचा. त्यावेळी १५ षटकांपर्यंत दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याचा नियम होता. याचाच फायदा घेत, रोमेश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायचा. सुरुवातीच्या षटकांमध्ये तो गॅपमध्ये चेंडू मारत धावा गोळा करायचा. दोघेही फलंदाज गॅपमध्ये शॉट खेळण्यात तरबेज होते, त्यामुळे गोलंदाज या दोघांनाही घाबरायचे. 

मॉडर्न डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा देखील आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे. यापूर्वी रोहित शर्मा देखील मध्यक्रमात फलंदाजी करायचा. मात्र सलामीला येताच त्याची फलंदाजी करण्याची शैली बदलली.

सबस्क्राईब करा

* indicates required