अशी असू शकते दुसऱ्या वनडेत भारतीय संघाची प्लेइंग ११! घातक खेळाडूची होऊ शकते एंट्री..

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतो. पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३५० धावांचा डोंगर उभारला होता. हा सामना भारतीय संघाने १२ धावांनी आपल्या नावावर केला होता.
दुसऱ्या वनडेसाठी असा असू शकतो भारतीय संघ :
यापूर्वी सलामीला कोण जाणार? असा प्रश्न भारतीय संघासमोर असायचा. मात्र आता शुभमन गिलने द्विशतक झळकावल्यानंतर त्याची सलामीची जागा जवळजवळ निश्चित झाली आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघेही डावाची सुरुवात करण्यासाठी येतील. तर तिसऱ्या क्रमांकावर नेहमी प्रमाणेच विराट कोहली फलंदाजीला येऊ शकतो. पहिल्या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पुढील सामन्यात तो मोठी खेळी करू शकतो.
असा असू शकतो मध्यक्रम..
विराट कोहलीनंतर चौथ्या क्रमांकावर ईशान किशन फलंदाजीला येऊ शकतो. पहिल्या सामन्यात ईशान देखील फ्लॉप ठरला होता. त्यामुळे ईशान कडून देखील मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. ईशान किशनने देखील बांगलादेश विरुध्द झालेल्या वनडे सामन्यात दुहेरी शतक झळकावले होते. तर पाचव्या क्रमांकावर टी -२० क्रिकेटचा अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजीला येऊ शकतो.
या अष्टपैलू खेळाडूंना मिळू शकते संधी..
अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर हार्दिक पंड्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. तर वॉशिंग्टन सुदंर पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत खेळताना दिसून येऊ शकतो. तर गेल्या सामन्यात ४ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, जम्मू काश्मीर एक्सप्रेस उमरान मलिकला देखील संधी दिली जाऊ शकते.
अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शाहबाज अहमद/वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर/उमरान मलिक.