विराटच्या बॅटबद्दल या खास गोष्टी तुम्ही जाणता का?

धावांची भूक घेऊन मैदानात उतरणारा विराट कोहली जणू रन मशिन बनून धावांचा डोंगर उभा करतो आहे, रोज नवनवे विक्रम बनवतो आहे. साहजिकच यामागे त्याची अपार मेहनत, खेळण्याचे तंत्र आणि शैली, आक्रमक मनोवृत्ती, या गोष्टी तर आहेत. पण यासोबत त्याच्या वेगळ्या अशा बॅटलाही थोडसं श्रेय द्यायला हवं. कशी आहे या जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाची बॅट? काय आहे तिच्यात खास? चला एक नजर टाकूया... 

विराट भाऊंच्या बॅटचं वजन असतं १.१ ते १.२३ कीलोग्रॅम्सच्या दरम्यान. आणि ती बनवली जाते ग्रेड ए च्या निवडक इंग्लिश विलोपासून. या बॅटचं हॅन्डल ९ पीस केनचं बनवलं आहे आणि ते शॉक अब्सॉर्व्ह करू शकतं. ६ पीस केन, ६ पीस केन, १२ पीस केन अशा प्रकारांनुसार बॅटच्या हॅन्डलची लांबी कमी-जास्त असते. विराटच्या बॅटच्या कर्व्हड् ब्लेड्सची जाडी असते ३८ ते ४२ मिलीमीटर. 

स्त्रोत

तुम्हाला काय वाटतं? किती असेल विराटच्या एका बॅटची किंमत? एखाद्या बॅटची किंमत ही त्या बॅटवर किती ग्रेन्स आहेत यावर अवलंबून असते मंडळी. ग्रेन्स म्हणजे त्या बॅटवर असणार्‍या रेषा बरं का. या रेषा किती असाव्यात हे त्या विलो लाकडाच्या आयुष्यावरून ठरवलं जातं. एकंदरीत इथे जेवढ्या ग्रेन्स जास्त तेवढाच त्या बॅटचा स्ट्रोक चांगला असतो. सामान्यतः ७ पेक्षा अधिक ग्रेन्स असणार्‍या बॅट उत्तम मानल्या जातात. आपल्या विराटभाऊंच्या बॅटवर ८ ते १२ या संख्येत ग्रेन्स असतात. आणि त्यांच्या एका बॅटची किंमत आहे चक्क १७,००० ते २३,००० रूपये!! विचार करा येवढ्या पैशात आपण किती बॅट खरेदी केल्या असत्या! या बॅट्सचा लिलाव लावून नंतर त्यांना बक्कळ पैसा मिळतो हा विषय वेगळा... 

 स्त्रोत

विराटच्या या बॅटवर MRF चा लोगो लावण्यासाठी विराट ८ कोटी रूपये घेतो.

सबस्क्राईब करा

* indicates required