computer

राहुल + सचिन = रचिन -- क्रिकेटमध्ये पण असे फॉर्म्युले असतात ?

क्रिकेटसाठी भारतात असलेले वेड किती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.क्रिकेटपटू बॉलीवूड स्टार्स एवढेच लोकप्रिय भारतात आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या नावावरून मुलांचे नाव ठेवले असेही बरेच लोक सापडतील.मात्र आज ज्यांची गोष्ट तुम्ही वाचणार आहात, त्यांची कहाणी मात्र चांगलीच भन्नाट आहे.

रवी कृष्णमूर्ती हे मूळ बंगलोरचे असलेले गृहस्थ आपल्या पत्नीला सोबत घेऊन १९९० साली न्यूझीलंडला स्थायिक झाले. येथील वेलींग्टन या शहरात त्यांनी हट हॉक्स क्लब नावाची कंपनी सुरू केली. देश सोडला तरी इतर अनेक भारतीयांप्रमाणे क्रिकेटबद्दल त्यांचे प्रेम अबाधित होते.

रवी यांना राहुल द्रविड आणि सचिन दोन्ही खूप आवडत होते.रवी यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न होते,पण ते काही कारणाने पूर्ण होऊ शकले नाही. आता त्यांना मुलगा झाला होता. मुलगा तर झाला पण त्याचे नाव नेमके राहुल ठेवायचे की सचिन हा त्यांना प्रश्न पडला. यावर त्यांनी अफलातून तोडगा काढला. तो म्हणजे त्यांनी मुलाचे नाव रचिन ठेवले. राहुल आणि सचिन दोघांचे नाव मिळून रचिन !!
 

रवी स्वतः क्रिकेटपटू होऊ शकले नसले तरी आपले स्वप्न मुलात पाहिले. रचिन लहानपणापासून चांगला खेळ करत होता. हळूहळू करत रचिनने वडिलांच्या अपेक्षा पुर्ण करण्यास सुरुवात केली. त्याची निवड न्यूझीलँडच्या अंडर १९ संघात दोन वेळा झाली.

मात्र एकवेळ अशी आलीच जेव्हा त्याची निवड थेट न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात झाली. सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या  सामन्यात  त्यची निवड झाली होती. आजवर त्याने सहा T20 सामने खेळले आहेत. चांगली बॅटिंग करण्याबरोबर रचिन स्पिन बॉलिंग पण करतो.

रचिनच्या रूपाने अजून एक भारतीय वंशाचा खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमवू पाहत आहे ही भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणायला हवी.

सबस्क्राईब करा

* indicates required