computer

क्रिकेटमध्ये नेट रन रेट कसा मोजतात याचं सूत्र तर समजून घ्या..

नेट रन रेट हा शब्द अनेकवेळा कानावरून जातो. पण नेमका हा नेट रन रेट असतो काय आणि तो कसा मोजतात हे अनेकांना कळत नाही. वनडे सामन्यांमध्ये सामना बरोबरीत सुटण्याच्या परिस्थितीत हा नेट रन रेट खूप उपयोगाचा असतो. नेट रन रेट समजून घेणे तसे कठीण काम नाही.

एखाद्या संघाचा नेट रन रेट हा पूर्ण मालिकेत त्यांनी केलेल्या सरासरी धावांची वजाबाकी प्रत्येक ओव्हरमागे सरासरी धावा यांच्याशी करून काढला जात असतो. सामना टाय झाला तर नेट रन रेट खूप महत्त्वाचा ठरतो.

प्रभावी नेट रन रेट फॉर्म्युला = पूर्ण मालिकेत प्रत्येक ओव्हरमागे केलेल्या सरासरी धावा - समोरच्या संघाविरुद्ध केलेल्या सरासरी धावा.
किंवा प्रभावी नेट रन रेट फॉर्म्युला= ((संघाने केलेल्या एकूण धावा/ संघाने खेळलेल्या एकूण ओव्हर्स)) ((समोरच्या संघाविरुद्ध केलेल्या एकूण धावा/ समोरच्या संघाविरुद्ध खेळलेल्या एकूण ओव्हर्स))

एकूण धावा = बॅटिंग करणाऱ्या संघाने बॉलिंग करणाऱ्या संघाविरुद्ध संपूर्ण मालिकेत केलेल्या धावा.

एकूण ओव्हर्स = बॅटिंग संघाने खेळलेल्या ओव्हर्स आणि बॉलिंग संघाने टाकलेल्या एकूण ओव्हर्स.

पण जर एखादा संघ २० ओव्हर्सच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला तर नेट रन रेटसाठी पूर्ण ५० ओव्हर न मोजले जाता फक्त २० ओव्हर मोजले जातात. पण जर एखाद्या संघाने २० ओव्हर्सच्या आत टार्गेट गाठले तर पूर्ण ओव्हर्स मोजले जातात.

आयसीसीच्या मेन्स वनडेच्या १६.१०.२ नियमानुसार ज्या सामन्यांचे निकाल डकवर्थ ल्युईस सारख्या नियमांनी लागलेले आहेत म्हणजे सामना पूर्ण झाला नाही किंवा रद्द झाला अशा परिस्थितीत संघ १ हा संघ २ च्या तुलनेत जितके ओव्हर्स खेळला आहे त्यानुसारच रन रेट मोजला जातो. म्हणजे समजा संघ १ ने ५० ओव्हर्समध्ये ३०० धावा केल्या आणि संघ २ साठी ४८ ओव्हर्समध्ये ३०२ च टार्गेट आले असेल तर पहिल्या संघाचा स्कोर ३०१ हा धरला जाईल.

आहे ना सोप्पं गणित?

सबस्क्राईब करा

* indicates required