व्हिडीओ: ४४ वर्ष आधी भारताने पाकिस्तानला हरवून पहिल्यांदा हॉकी वर्ल्ड कप जिंकला

Subscribe to Bobhata

भारताचा एक जमान्यात हॉकीमध्ये दरारा होता. हॉकीला क्रिकेटसारखा दर्जा होता. पण ह्या आता जुन्या आठवणी इतिहासजमा झाल्या आहेत. आज आम्ही या आठवणींच्या पुस्तकातून एक पान घेऊन आलो आहोत. १५ मार्च १९७५, म्हणजे आजपासून ४४ वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानचा हॉकी वर्ल्ड कप फायनलमध्ये २ विरुद्ध १ ने पराभव केला व वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

पाकिस्तान हा १९७१चा वर्ल्ड चॅम्पियन होता, तर भारताला ७३साली फायनलमध्ये नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला होता. १९७५च्या स्पर्धेतही भारताचा फॉर्म फार चांगला नव्हता. गृप स्टेजमध्ये भारताने ३ सामने जिंकले, एक ड्रॉ केला, तर एकात पराभव पत्करावा लागला होता. सेमिफायनलमध्ये भारताने मलेशियाचा ३ विरुद्ध २ ने पराभव केला होता. फायनलमध्ये पाकिस्तानसोबत सामना चुरशीचा ठरला होता. पाकिस्तानने पहिल्या हाफमध्ये गोल करून बढत मिळवली होती. भारताने मागून येऊन दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करत सामना जिंकला होता. हे सगळं वाचण्यापेक्षा या व्हिडीओमधला संपूर्ण सामना पाहाणं अधिक रंगतदार आहे राव!! 

मात्र भारताला १९७५ सालाच्या या विजयानंतर एकदाही वर्ल्ड  कप जिंकता आला नाहीय!!

सबस्क्राईब करा

* indicates required