या ५ क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना केलं डेट! शेवटी विवाह करण्यास दिला नकार...

क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यातील नातं काही नवीन नाहीये. अनेकदा क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यात नातेसंबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही जोडपे एकत्र राहण्यात यशस्वी झाले, तर काहींचा ब्रेकअप झाला. बोभाटाच्या या लेखात आम्ही अशा क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी बॉलीवूड अभिनेत्रींना डेट केले, पण तिच्याशी लग्न केले नाही आणि दुसऱ्या मुलीला आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत ते टॉप-५ खेळाडू, चला पाहूया.

) एमएस धोनी :

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी देखील अभिनेत्रीच्या प्रेमात होता. जुली या चित्रपटाची अभिनेत्री लक्ष्मी राय आणि एमएस धोनी यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. लक्ष्मीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही वर्षांपूर्वी तिने ब्रेकअप बद्दल मोठे वक्तव्य केले होते. एमएस धोनीने २०१० मध्ये साक्षी धोनी सोबत विवाह केला होता.

) विराट कोहली:

विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे,हे सर्वंनाच जाणून घ्यायचं असतं. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माची जोडी देखील हिट आहे. मात्र अनुष्का शर्मा त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याने बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केले होते. विराट कोहली आणि प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल इजाबेल लीट यांच्यात अफेअर असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. ती आमिर खान सोबत तलाश चित्रपटात झळकली होती. दोघेही २०१२ ते २०१४ दरम्यान एकत्र राहिले. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं असल्याची बातमी समोर आली होती.

) हार्दिक पंड्या :

भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नताशा स्टानकोव्हीक सोबत विवाह केला आहे. मात्र त्याचा विवाह होण्यापूर्वी त्याने अनेक मुलींना डेट केले आहे. त्याने बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राला देखील डेट केले आहे. दोघांची बातचीत ट्विटरवरून सुरू झाली होती. पुढे याच बातचीतचे रूपांतर नात्यात झाले होते. मात्र काही वर्षांपूर्वी हार्दिक पंड्याने नताशा स्टानकोव्हीक विवाह केला. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

) युवराज सिंग:

भारतीय संघाला टी -२० आणि वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या युवराज सिंगचा देखील या यादीत समावेश आहे. युवराज सिंग २००७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माला डेट करत असल्याची बातमी समोर आली होती. दोघेही बरेच वर्ष एकत्र राहिले. मात्र जेव्हा या दोघांना त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असे म्हटले होते. मात्र काही वर्षांनी दोघांचा ब्रेकअप झाला. युवराज सिंग बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच सोबत विवाह बंधनात अडकला आहे.

) सौरव गांगुली:

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचा देखील या यादीत समावेश आहे. ९० च्या दशकातील अभिनेत्री नगमा आणि सौरव गांगुली यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. शेवटी सौरव गांगुलीने आपली पत्नी डोना सोबत राहण्याचा निर्णय घेत,रिलेशनशिपला ब्रेक लावला.

सबस्क्राईब करा

* indicates required