४ दिग्गज भारतीय खेळाडू ज्यांनी कधीही जिंकली नाही रणजी ट्रॉफी स्पर्धा...

क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला नेहमी वाटत असतं की, त्याने एक दिवस भारतीय संघासाठी पदार्पण करावं. मात्र ही गोष्ट इतकी सोपी गोष्ट नाहीये. कारण भारतीय संघासाठी खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये जोरदार कामगिरी करावी लागते. रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पडावा लागतो. त्यानंतर तो खेळाडू निवडकर्त्यांच्या नजरेत येतो आणि त्याला भारतीय संघात संधी दिली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. चला तर पाहूया.

) मोहम्मद अझरुद्दिन (Mohammad azharuddin)

१९८५ मध्ये बेस्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारे मोहम्मद अझरुद्दिन विस्फोटक फलंदाजांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४५.०३ च्या सरासरीने २२ शतके झळकावली आहेत. मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद अझरुद्दिन यांना आपल्या रणजी संघाला एकही ट्रॉफी जिंकुन देता आली नाही.

मोहम्मद अझरुद्दिन यांनी १९८१ मध्ये हैदराबाद संघासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांची भारतीय संघात निवड झाली आणि २००० पर्यंत ते रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत राहिले. मात्र आपल्या संघाला एकदाही जेतेपद मिळवून दिले नाही.

) वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) :

१९९६ मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणारा वीवीएस लक्ष्मण दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. फलंदाजी करताना त्याचा टायमिंग अचूक होता. तसेच त्याच्या फलंदाजीमध्ये मोहम्मद अझहरुद्दिनची झलक पाहायला मिळायची. मात्र मोहम्मद अझरुद्दिन प्रमाणेच वीवीएस लक्ष्मणला देखील रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या संघाला जेतेपद मिळवून देता आले नाही.

वीवीएस लक्ष्मणने १९९३ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने २०१२ पर्यंत हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्याला एकदाही आपल्या संघाला जेतेपद मिळवून देता आले नाही.

) युवराज सिंग (Yuvraj Singh

२००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक स्पर्धेत जर युवराज सिंग भारतीय संघात नसता, तर भारतीय संघ या दोन्ही स्पर्धा जिंकू शकला नसता. त्याने या स्पर्धांमध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११,००० धावा आणि १०० गडी बाद करणाऱ्या या खेळाडूला रणजी ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवता आला नाही. 

१९९७ मध्ये पंजाब संघासाठी पदार्पण करणाऱ्या युवराज सिंगला २००० साली भारतीय संघात प्रवेश मिळाला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मात्र त्याला एकदाही आपल्या संघाला रणजी ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून देता आला नाही.

) एमएस धोनी (Ms Dhoni) :

कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी -२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवला होता. २००० साली बिहार संघासाठी पदार्पण करणाऱ्या एमएस धोनीने जमशेदपूरमध्ये आसाम विरुध्द पहिला सामना खेळला होता. २००३-२००४ च्या हंगामात केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्यांनतर त्याने एकापेक्षा एक मोठे विक्रम प्रस्थापित केले. मात्र त्याला रणजी ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून देता आला नाही.

हे दिग्गज खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरले. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. तुम्हाला आणखी असे क्रिकेटपटू माहीत आहे का? जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिट ठरले मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकू शकले नाही? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required