आयपीएलची झिंग आणि सोबत नवं थीम सॉंग...ऐकलंत की नाही अजून??

यंदाचा आयपीएल सीझन ४ एप्रिल म्हणजे अगदी थोड्याच दिवसांवर आलेला असताना नुकतंच आयपीएलचं नवीन थीम सॉंग लाँच करण्यात आलंय. यावेळी नवीन थीम तयार करताना ‘ये देश है वीर जवानो का’ हे जुनं गाणं वापरण्यात आलंय. गाणं तयार करतानाच ते संपूर्ण भारतात ऐकलं जावं म्हणून हिंदी बरोबर तामिळ, बंगाली, कन्नड आणि तेलगू अशा ५ भाषांत तयार करण्यात आलेलं आहे.

या गाण्याच्या दिग्दर्शनासाठी दक्षिण आफ्रिकेच्या डॅन मेस या दिग्दर्शकाला पाचारण करण्यात आलेलं होतं. गायक सिद्धार्थ बसरूर आणि संगीत दिग्दर्शक राजीव भल्ला यांनी या गाण्याला नवीन ढंगात उतरवलं आहे. या जुन्या गाण्याला रॉकिंग टच देताना आयपीएलच्या त्या फेमस ‘पिपाणी’ ला अगदी तसंच ठेवलेलं आहे. शेवटी ती आयपीएलची ओळख आहे भाऊ!!

चला तर मंडळी, तुम्ही सुद्धा ऐका आयपीएल २०१८ चं आयपीएल थीम सॉंग आणि शेअर करायला विसरू नका राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required