computer

IPL लिलावात लागली यांची लॉटरी : या नव्या चेहऱ्यांचं झालंय दमदार स्वागत...

          मनात हुरहूर.... डोक्यात तर्कवितर्क, आणि ते सक्तीने आपल्याला ऐकायला लावणारे क्रिकेटचे  पीएचडी धारक मित्र... काल IPL च्या दहाव्या सीझनसाठी खेळांडूची बोली लागली तेव्हा तुमचीही हीच परिस्थिती होती का? थोडा अपेक्षित, तर थोडा अनपेक्षित निकाल या लिलावाने समोर आणलाय खरा. पण इथे बघा.. काही नव्या खेळाडूंना या लिलावात चांगलीच लॉटरी लागलीय. 

 

 

बेन स्टोक्स (इंग्लंड)

या इंग्लिश अॉलराऊंडरसाठी पुणे (RPS) संघानं १४.५ कोटी रुपयांची घसघशीत रक्कम मोजली. विशेष म्हणजे स्टोक्स पहिल्यांदाच IPL मध्ये सहभागी होतोय.

टायमल मिल्स (इंग्लंड)

५० लाखांची बेस प्राईस असणार्‍या या नवख्या गोलंदाजाला बेंगळुरू (RCB) संघाने चक्क १२ कोटी रुपयांना खरेदी केलं. 

कागीसो रबाडा (द.आफ्रिका)

दक्षिण आफ्रिकेच्या या २१ वर्षीय वेगवान गोलंदाजाला दिल्ली (DD) संघानं ५ कोटींना खरेदी केलंय.

राशीद खान (अफगाणिस्तान)

यावर्षी IPL मध्ये अफगाणिस्तानचे खेळाडूही खेळतील. अफगाणिस्तानच्या लेग स्पिनर राशीद खान याला सनरायझर्स हैद्राबाद संघानं ४ कोटींना खरेदी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

टी. नटराजन (भारत)

एका मजुराचा मुलगा असलेला थंगारसु नटराजन तामिळनाडूचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं या बॉलरसाठी ३ कोटी मोजले.

मोहम्मद सिराज (भारत)

हैद्राबाद कडून खेळणारा हा जलदगती गोलंदाज एका ड्रायव्हरचा मुलगा आहे. या खेळाडूला सनरायझर्स हैद्राबाद संघानं २.६ कोटींना खरेदी केलंय. बेस प्राईस होती २० लाख.

के. गौतम

कर्नाटक संघासाठी खेळणारा आॅफ-स्पिनर गोलंदाज. मुंबई इंडियन्स संघाने कृष्णाप्पा गौतमसाठी २ कोटी रुपये मोजले.

अनिकेत चौधरी (भारत)

भारत-अ संघामधून खेळणारा गोलंदाज अनिकेत चौधरी रॉयल चॅलेंजर्सकडून २ कोटी रूपयांना खरेदी केला गेला.

बासिल थंपी (भारत)

केरळाचा पेस बॉलर बासिल थंपी याला गुजरात लायन्स संघानं ८५ लाख रुपये मोजून आपल्याकडे खेचलंय.

एकलव्य द्विवेदी (भारत)

उत्तर प्रदेश संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूला हैद्राबाद संघानं ७५ लाख रुपयांना खरेदी केलंय. 

सबस्क्राईब करा

* indicates required