हा मराठमोळा गडी चालला अल्टीमेट फायटिंग चँपियनशिप खेळायला...

भरत ‘डेअरिंग’ खंडारेच्या रूपाने आपल्याला ‘अल्टीमेट फायटिंग चँपियनशिप’ अर्थात UFC मध्ये लढणारा पहिला भारतीय मिळालाय राव. ‘मिक्स मार्शल आर्ट’ (MMA) च्या UFC या संस्थेने याची अधिकृत घोषणा केली. भरत हा UFC मध्ये लढणारा पहिला भारतीय ठरला आहे. मंडळी, भरत महाराष्ट्राचा असल्याने त्याने देशाबरोबरच महाराष्ट्राचं नाव देखील उंचावलं आहे.

स्रोत

खंडारेने मिक्स मार्शल आर्टचा ‘फिदर वेट’ किताब जिंकला आणि त्याची UFC मध्ये एन्ट्री झाली. खरं तर भरत हा UFC मध्ये जाणारा दुसरा भारतीय आहे. याआधी अर्जुन भुल्लरची निवड झाली होती. पण भारतीय मातीत जन्मलेला ‘भरत खंडारे’ हा पहिला फायटर आहे. शिवाय MMA बरोबर करार करणारा  पहिला भारतीय देखील भरतच आहे. २५ नोव्हेंबरला शांघायमध्ये होणाऱ्या UFC फाईट नाईटमध्ये चीनच्या  Liu Pingyuan बरोबर त्याची लढत होईल.

UFC बद्दल बोलताना भरतने म्हटलंय की “ ‘MMA’ फायटरने UFC सारख्या नामांकित संस्थेशी जोडले जाणे हे काही स्वप्नापेक्षा कमी नाही. UFC जगातील पहिल्या क्रमांकाची MMA संस्था आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या देशासाठी आणि सुपरह्युमन जिमच्या माझ्या टीमसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.”

भरत खंडारे कोण आहे ?

स्रोत

भरत खंडारे हा २८ वर्षाचा युवक महाराष्ट्रात जन्मलेला MMA फायटर आहे. इंटरनेटच्या मदतीने तो मिक्स मार्शल आर्टच्या संपर्कात आला. रेसलिंगमध्ये अनुभव असला तरी त्याला MMA बद्दल काहीच माहिती नव्हते. त्याने मुंबईच्या ‘सुपरह्युमन जिम’ मधून MMA ची ट्रेनिंग घेतली. त्यानंतर त्याला MMA साठी कझाकिस्तानमध्ये लढण्याची संधी मिळाली. जॅक्सन-विंक मधून ट्रेनिंग घेतलेल्या  मोजक्या MMA फायटर्समध्ये  भरत खंडारेची गणना होते. त्याला भरत ‘डेअरिंग’ खंडारे म्हणून ओळख मिळाली आहे.

तर मंडळी, UFC मध्ये दाखल होऊन भारताचं नाव उंचावलेल्या भरत खंडारेला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. आपल्या महाराष्ट्राच्या फायटरला तुम्ही सपोर्ट करणार ना ?

सबस्क्राईब करा

* indicates required