तपासून पाहा - चिअरलीडर्सबद्दलची तुमची माहिती किती खरी आहे आणि किती खोटी ?

सध्या आयपीएलची धमाल गम्मत आपण रोज बघतो आहोत. आयपीएलचं आणखी एक  आकर्षण असतं ते म्हणजे चिअरलीडर्सचं. गोर्‍यागोर्‍या, तोकडे कपडे घातलेल्या प्रत्येक चौकार -षटकारावर नाचणार्‍या या पर्‍या रात्री तुमच्या स्वप्नात धूमाकूळ घालत असतीलच!  कोण असतात या मुली , येतात तरी कुठून, कसे असते यांचे आयुष्य आणि असे नाच नाचून काय मिळते यांना? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत.

आयपीएलच्या प्रत्येक संघासोबत त्यांची चिअरलीडर्सची एक टीम असते. चिअरलीडर्सची भरती करणार्‍या कंपन्या वेगवेगळ्या देशातून आलेल्या अर्जांची छाननी करून, त्यांच्या मुलाखती घेऊन, वेतन निश्चित करून त्यांची निवड करतात.

किती पैसे मिळतात हो? क्रिकेटरच्या सोबत यांचे 'काही' चालते का? म्हणजे आम्ही गुपचुप बघतो त्या फिल्ममधल्या मुलींसारख्याच 'मनमोकळ्या' असतात का या? 

अरे, हो..हो..  किती प्रश्न विचाराल?  सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो आम्ही! 

Image result for cheerleaders in iplस्रोत

पैशांचं म्हणाल तर प्रत्येक मॅचला १०० ते १५० डॉलर्स यांना मिळतात. डेल्ही डेअरडेव्हील्स - गुजरात लॉयन्स- मुंबई इंडियन्स - रायझींग पुणे-पंजाब किंग्ज - हे सर्व संघ त्यांना एका मॅचला ११० डॉलर्स देतात. बंगलोर रॉयल चॅलेंजर्स १५४ तर कोलकाता आणि हैद्राबादचे संघ १६५ डॉलर्स देतात. याखेरीज पार्टी अपियरन्स आणि बोनस वेगळा मिळतो. काही कंपन्या पूर्ण मोसमासाठी २५००० डॉलर्स पण देतात म्हणे. पण आर्थिक व्यवहार हा अत्यंत गुप्त विषय असतो आणि भरती करणार्‍या कंपन्यांमध्ये तुफानी स्पर्धा असते.  त्यामुळं नक्की आकडा कधीच कळत नाही. 

क्रिकेटर्ससोबत यांची वर्तणूक कशी असते हा प्रश्न उद्भवतच नाही.  कारण चिअरलिडर्स आणि क्रिकेटर यांची कधीच भेट होत नाही. कोणत्याही पार्ट्यांना त्यांना निमंत्रीत केलं जात नाही. त्यांच्या करारातील ही अट अत्यंत महत्वाची असते आणि या अटीचा भंग केला तर त्यांना ताबडतोब बाहेर काढलं जातं. २०१५च्या मौसमात काही क्रिकेटर्सनी केलेल्या लघळपणाबद्दल एका चिअरलीडरनं आपल्या ब्लॉगवर काही माहिती दिली होती तेव्हापासून काही अटी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जातात. 

Image result for cheerleaders in iplस्रोत


आता राहता राहिला प्रश्न त्यांच्या मनमो़कळेपणाचा!! मित्रांनो, मनात काही विचार असतील तर ते दूर करा! या चिअरलीडर्स तुमच्या-माझ्यासारख्याच घरातून आलेल्या असतात, बर्‍याचजणी नामांकित डान्स ट्रूपच्या सभासद असतात, काही मुली मायदेशात उच्च शिक्षण घेत असतात, काही शिक्षिका असतात, तर काही इतर व्यवसायात असतात. भारताची संस्कृती आणि भारताबद्दलचं आकर्षण त्यांना इथं खेचून आणतं. थोडेफार पैसे आणि सोबत मोफत भारत दर्शनाची संधी हे त्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचं असतं.


१. डेल्ही डेअरडेव्हील्सच्या एका चिअरलिडरच्या मते ‘या कामात आमच्यासाठी पैसे महत्वाचे नसून भारतीय संस्कृती तसेच भारत जवळून पाहणे हाच मुख्य उद्देश असतो.’

Image result for delhi daredevils cheerleadersस्रोत

२. एका चिअरलिडरनं तर असं सांगितलय की माझ्या आईला भारतीय सिनेमा खूप आवडतो’. त्या अजूनही ऐश्वर्या रायचे सिनेमे बघतात.

३. आपल्याला वाटत असेल या सर्व चिअरलिडर्स फॉरेनर्स असतील पण तसं नाहीये मित्रांनो. यात भारतीय मुलींचाही समावेश असतो.

Image result for ipl cheerleaders in indian avtarस्रोत

४. ‘कीव्ह’ येथून आलेल्या एका चिअरलिडरनं तर चक्क हिंदीत आपली ओळख करून दिली. ती सध्या हिंदी भाषेचं शिक्षण घेतेय आणि केवळ त्यासाठीच ती भारतात आलीय.

५. आपण नेहमी चिअरलिडर्सना लहान लहान कपड्यात पाहतो पण असली बात म्हणजे त्यांना साडी जास्त आवडते. अगदी भारतीय स्त्री सारखं म्हणजे कुंकू, बांगड्या, नाकातलं वगैरे घालायलाही यांना खूप आवडतं.


मंडळी या चिअरलिडर्सच्या बाबतीत काही गैरसमजुती आपल्या सर्वांमध्ये असतात त्यांना आता बदलायची गरज आहे असचं वाटतं !

सबस्क्राईब करा

* indicates required