computer

मराठमोळा अल्ट्रामॅन.. काय असते ही स्पर्धा? भारतातून कोण कोण सामिल झालं होतं?

आपला अनवाणी धावणारा हिरो- मिलिंद सोमण फ्लोरिडातल्या एका स्पर्धेसाठी गेला होता हे तुम्ही गेल्या आठवड्यात कदाचित वाचलं असेल. आज सकाळीच मिलिंद सोमणने त्याच्या फेसबुक वॉलवरती काही मित्रांसोबत हे अल्ट्रामॅन आव्हान पुरं केल्याची खुषखबर दिलीय..

 

अल्ट्रामॅन आव्हान

हे आव्हान  तसं पाहाता खूप अवघड आहे. पहिल्या दिवशी दहा किलोमीटर पोहणे अधिक १४८ किलोमीटर्स सायकलिंग, दुसर्‍या दिवशी पुन्हा  २७६ किलोमीटर सायकलिंग, तर तिसर्‍या दिवशी ८४ किलोमीटर्स धावायचंय. आहे ना खरंच अवघड!!

आणि या सगळ्या तीन दिवसांत मिलिंद सोमण नेहमीप्रमाणं अनवाणीच धावत होता. 

कोण आहेत आपले अल्ट्रामेन?

मिलिंद सोबत अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मन्मथ रेब्बा  या पाच जणांनी ही ५१७.५ किलोमीटर्स अंतर पार करून हे खडतर आव्हान पूर्ण करून दाखवलंय.

लाईफ अचिव्हमेंट...

ब्राव्हो अल्ट्रामेन.. भारतीयांना तुमचा अभिमान आहे!!

बातमी स्त्रोत- मिलिंद सोमण यांची फेसबुक वॉल..

सबस्क्राईब करा

* indicates required