नरसिंग यादववर चार वर्षे बंदी, अखेर रिओ ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर

आधी सुशील आणि नरसिंग यांच्यातला वाद, त्यांनतर झालेलं डोपिंग प्रकरण या सर्व वादांवर पडदा पडला आहे आणि भारताच्या ऑलिंपिक टीमला अजून एक धक्का बसला आहे.  नरसिंग यादव भारतात झालेल्या डोपिंग चाचणीत दोषी सापडला होता. त्यांनतर झालेल्या सुनावणीत NADA ने "माझ्या प्रतिस्पर्ध्याने माझ्या नकळत बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन करायला लावले" हा बचाव मान्य करत त्याला क्लीन चिट दिली होती.

पण WADA ने या विरुद्ध अपील केलं होतं. या नव्याने झालेल्या सुनवाईत नरसिंगला आपला बचाव मांडता आला नाही. अपील कोर्टाने त्याचे म्हणणे अमान्य करत त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. नरसिंग दोषी असल्यास त्यावरची बंदीची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. पण नरसिंगच्या सामन्याच्या एक दिवस आधी ही सुनवाई करताना वाडा प्रशासनाने हे प्रकरण नक्कीच चुकीच्या पद्धतीने हाताळले. 

वाडा ,नाडा आणि भारतीय कुस्ती प्रशासन यांच्या गोंधळामुळे आज भारतातर्फे या वजनगटात कोणीच लढणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required