जोकोविचच्या बायकोनं त्याला लाईव्ह व्हिडिओदरम्यान का झापलं?

नोवाक जोकोविच जागतिक पातळीवरचा महान टेनिस खेळाडू आहे. पण म्हणून त्याची बायको त्याला झापत नसेल असं नाही बरं... जोकोविचलाही याचा साक्षात्कार अगदी अलिकडेच झाला.

पुढच्या आठवडयात मेक्सिकोमध्ये अकापल्को टूर्नामेंट्स चालू होतायत. जोकोविच त्यासाठी सध्या सराव करतोय. त्याची बायको जेलेना त्या सरावाचं फेसबुक लाईव्ह शूटिंग करत होती. शूटिंग संपता-संपता जोकोविच कॅमेर्‍याजवळ येऊन " मला कॅमेर्‍याच्या जवळ असायला आवडतं. कदाचित त्यामुळं मला अधिक जवळीक, अधिक मैत्र वाटतं.  (I like to get near the camera, it makes me feel more intimate I guess, more friendly)" असं म्हणत त्यानं बायकोच्या हातून कॅमेरा काढून घेतला.

त्यानं ज्याप्रकारे तिच्या हातून कॅमेरा कढून घेतला त्यावरून जेलेना रागावली आणि तिनं चालू असलेल्या लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये,  "तुला काही मॅनर्स आहेत की नाहीत?  तू मला थँक्यू म्हणायला नको होतंस का?" असं म्हटलं. पुढच्याच क्षणी तिला आपली चूक उमगली होती, पण तोवर उशीर झाला होता. हा  फेसबुक लाईव्ह व्हिडिओ तिच्या नवर्‍याच्या ७० लाख फॅन्सपर्यंत पोचणार होता. 

जोकोविचच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळं आता या कमबॅकच्या टूर्नामेंटसाठी तो अधिक सराव करतोय. या १२ मिनिटांच्या व्हिडिओत पाहिलंत तर तो बरेच फटके परतवताना आणि त्याच्या कुत्र्यासोबत खेळताना दिसतोय. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required