computer

१२ ऑगस्टला भारताचा सहभागः आज अ‍ॅथलेटिक्स सुरू. मात्र पदकासाठी अतानु, गगन नारंग यांच्यावर भिस्त

कालचे महत्त्वाचे निकालः

गोल्फमध्ये पहिल्या फेरीत शिव चौरसिया २७ तर अनिर्बन ५०व्या स्थानावर आहे. अजून दोन फेर्या व्हायच्या आहेत. पण या क्रमांकावरून हे दोघेही अंतिम फेरीत जातीलसे वाटत नाही.

बॅडमिंटनच्या दोन्ही दुहेरी स्पर्धांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. अर्थात हे गट सामने असल्याने या दोन्ही संघांना आव्हान टिकवण्यासाठी पुढिल दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. 

बॅडमिंटन एकेरी स्पर्धांमध्ये मात्र सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधु आणि श्रीकांत कदंबी या तिघांनीही आपापला पहिला सामना सरळ दोन सेट्समध्ये जिंकला.

तिरंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे कोरीयन व तैपेयीच्या खेळाडूंसमोर दिपिका व बोम्बायला देवी टिकाव धरू शकल्या नाहित व त्यांच्या आव्हान संपुष्टात आले.

पुरुष बॉक्सिंगच्या ५६ किलो वजनी गटातही भारताचे अव्हान संपुष्टात आले.

पुरुष हॉकीमध्ये भारताला नेदरलँड्सच्या "नारंगी-आर्मी" ने २-१ तर महिला हॉकीत अमेरिकन टिमने ३-० असे नमवले. याच बरोबर महिला टिमचे आव्हान संपुष्टात आले आहे.

टेनिसमध्ये सानिया-बोपन्ना जोडीने सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. तिथे त्यांचा सामना अँण्डी मरे आणि वॅटसन या ब्रिटीश जोडगोळीसोबत होईल.

 

आज काय?:

ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून सातव्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल. 

गोल्फ

गोल्फची दुसरी फेरी रात्री ८:३० वाजता सुरू होईल.

नेमबाजी

पुरुष ५०मी रायफल प्रोन स्पर्धेत चैन सिंग आणि गगन नारंग भारतातर्फे सहभागी असतील.याची क्वालिफिकेशनची फेरी रात्री १० वाजता सुरू होईल व रात्री १२ वाजता याची अंतिम फेरी असेल.

पुरुष २५मी रॅपिड फायर पिस्टल स्पर्धेत भारताचा गुरप्रीत सिंग सहभागी असेल. ही स्पर्धा पहाटे १:१५ वाजता सुरू होईल. 

पुरुष स्कीट स्पर्धेत भारताचा महिराज खान सहभागी असेल

बॅडमिंटन

महिला दुहेरी व पुरुष दुहेरीच्या गटातील पुढिल सामने रात्री १० व १२ वाजता होतील.

तिरंदाजी

पुरुष तिरंदाजीमध्ये अतानु दासचा सामना कोरीयन प्रतिस्पर्ध्याशी रात्री १०:०० वाजता होईल. अतानु चांगला खेळाडू असला तरी त्याला ड्रॉ खडतर आला आहे. 

बॉक्सिंग

७५ किलो वजनी गटात पहिला सामना जिंकलेल्या विकास यादवचा दुसरा सामना टर्कीश खेळाडू सोबत असेल. हा सामना शनिवारी सकाळी ८ वाजता बघता येईल.

अॅथलेटिक्स

आजपासून अ‍ॅथलेटिक्सच्या खेळांना प्रारंभ होत आहे.आज भारताचे पुढिले खेळाडू सहभागी असतीलः

पुरुष थाळी फेक क्वालिफिकेशन : विकास गौडा

महिला गोळाफेक क्वालिफिकेशनः मनप्रीत कौर

पुरुष ८०० मी.:जिन्सन जॉन्सन (३ रा हिटः रात्री ११:२६)

पुरुष २० किमी चालणे: क्रिष्णन गणपती, गुरमीत सिंग, मनिष सिंग (पहाटे ३:३० ला सुरूवात). यातील विजेत्यांना थेट पदक मिळेल.

पुरुष ४०० मी: मुहम्मद याहिया (७वा हीट: उद्या सकाळी १० वाजता)

पुरुष लांब उडी: आंकित शर्मा (उद्या सकाळी १०:२०)

पदकाच्या अपेक्षा

आज ज्या स्पर्धात पदक मिळणार आहे त्यापैकी नेमबाजी, तिरंदाजी आणि महिला गोळाफेक स्पर्धेत भारताचा सहभाग आहे. 

तिरंदाजीमध्ये फॉर्मात असलेल्या अतानु दासला ड्रॉ कठीण आल्याने त्याने जर उप-उपांत्यपूर्व फेरी जिंकली तर त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करता येईल.  नेमबाजीमध्ये गगन नारंग या दोनदा विश्वविक्रम केलेल्या खेळाडू कडून अपेक्षा न करणे धाडसाचे ठरेल. इतर नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये आणि महिला गोळाफेक किंवा २० किमी चालणे स्पर्धेत मात्र पदकाची अपेक्षा अजिबात नाही. 

सबस्क्राईब करा

* indicates required