computer

ऑलिंपिक २०१६ : फेल्प्स आणि इतर खेळाडूंच्या अंगावरच्या जांभळ्या डागांचं रहस्य उलगडलं..

ऑलिंपिकमध्ये फक्त खेळच नाही, तर  सुरस आणि चमत्कारिक कथांचाही तितकाच भरणा असतो. गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंच्या अंगावरच्या, विशेषत: मायकेल फेल्पसच्या अंगावरच्या जांभळ्या डागांबद्दल खूप चर्चा चालू आहे. 

तर या जांभळे डाग देण्याच्या पद्धतीला कपिंग म्हणतात. 

 

असं करतात कपिंग-

छोट्या काचेच्या बाटल्यांमधून अग्नि फिरवल्यानं त्या बाटलीतला ऑक्सिजन जळून जातो. मग ती बाटली पटकन अंगाला चिकटवतात. आतला ऑक्सिजन जळून गेल्यानं आत निर्वात पोकळी म्हणजेच व्हॅक्युम तयार होते आणि बाटली शरीरापासून निघत नाही. उलट तया बाटलीत असलेला शरीराचा भाग सुजतो आणि काळानिळा होतो. 

 

 

खेळाडूंना पसंत आहे हे कपिंग...

या कपिंगच्या वेदनांमुळे म्हणे  सहन करण्याची शक्ती मिळते, स्नायू दुखत नाहीत आणि शरीरभर रक्तप्रवाहही छान चालू राहतो. उगीच नाही, खेळाडू या कपिंगमागे इतके खुळावले आहेत ते..

सबस्क्राईब करा

* indicates required