पी. व्ही. सिंधूला मिळाले सिल्व्हर मेडल- भारत कन्यांनी उंचावली भारताची मान

२१ वर्षांच्या पी. व्ही. सिंधू या फुलराणीनं आजवर बॅडमिंटनच्या खेळात कोणत्याही भारतीय खेळाडूला जे जमलं नाही ते करून दाखवलंय. या वर्षी ऑलिंपिंकमध्ये या स्थानावर पहिल्यांदाच एखाद्या भारतीय खेळाडूनं बॅडमिंटनच्या पदकापर्यंत बाजी मारली. कालपासून "भारतीय बायकांना सोनं आणि चांदीमध्ये ऑप्शन दिला तर त्या नक्कीच सोनं निवडतील"छापाच्या फॉरवर्डस सोबत भारतीयांच्या सुवर्णपदकाच्या आशाही उंचावल्या होत्या. 

आज स्पेनच्या कॅरोलिना मरीनसोबत पी. व्ही. सिंधूची लढत झाली. पहिला सेट सिंधूने जिंकला. मात्र नंतरच्या दोन सेटसमध्ये कॅरोलिना मरीनचा खेळ अधिक आक्रमक झाला आणि विजयाची माळ तिच्या गळ्यात पडली.  भारताला मेडल्स दुष्काळातून भारतभूच्या कन्यांनी बाहेर काढलं आणि साक्षी मलिक नंतर पी.व्ही. सिंधूनेही सिल्व्हरमेडल पटकावून भारताची मान उंचावली. सिल्व्हर मेडल मिळवणारी सिंधू ही पहिलीच  भारतीय महिला खेळाडू  आहे.

पी. व्ही. सिंधूंचं तिच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि आमचा तिला बोभाटा सलाम!!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required