computer

जाणून घ्या यावर्षीच्या प्रो-कबड्डीमध्ये कुणाला जास्त बोली लावली गेली

आयपीएलच्या खालोखाल जर भारतात कुठली स्पर्धा प्रसिद्ध असेल तर ती म्हणजे प्रो-कबड्डी लीग. आता या स्पर्धेत लागलेली बोली बघितली तर श्रीमंतीच्या बाबतीत प्रो-कबड्डी आयपीएलहून कमी नाही हे तुमच्या लक्षात येईल.
 

प्रो-कबड्डीचा आठवा हंगाम डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी लावण्यात आलेल्या बोलीत प्रदीप नरवाल याला आजवरच्या प्रो-कबड्डीच्या इतिहासातील सर्वात जास्त बोली लावण्यात आली आहे. त्याला 'युपी योद्धा' या संघाने तब्बल १.६५ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हरयाणा स्टीलर्सकडून मोनू गयात हा खेळाडू १.५१ कोटींमध्ये खरेदी करण्यात आला होता. प्रदीपने त्याचा विक्रम तोडला आहे. गेले ५ हंगाम प्रदीप पटना पायरट्सकडून खेळत होता. पण आता त्याला नवीन संघ मिळाला आहे.

तेलगू टायटन्सने १.३० कोटी रुपये मोजत सिद्धार्थ देसाईला आपल्याच संघात ठेवले आहे. यावेळी २२ परदेशी खेळाडूंना देखील बोलीत विविध संघांनी खरेदी केले आहे. तर गेली ६ हंगाम तेलगू टायटन्सकडून खेळणारा राहुल चौधरी आता पुणेरी पलटन्सकडून खेळणार आहे.

ज्यावेळी नजरेत भरणारी बोली ठरली ती रोहित गुलीया या खेळाडूची. त्याने गेल्या वेळच्या २५ लाखांपासून थेट ८३ लाखांवर उडी मारली आहे. त्याला हरियाणा स्टीलर्सने खरेदी केले आहे. अशीच खास बोली ठरली ती रायडर मनजीतची. त्याला पण ३० लाखांवरून थेट ९२ लाखांत तमिळ थलाईवाजने खरेदी केले आहे.

डिसेंबर महिन्यात होऊ घातलेली ती दमदार स्पर्धा आता हे खेळाडू कशा पध्दतीने गाजवतात यावर लक्ष असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required