Pro kabaddi auction: लिलावाच्या पहिल्या दिवशी हे खेळाडू झाले कोट्याधीश; पाहा संपूर्ण यादी..

प्रो कबड्डी २०२२ (Pro kabaddi 2022) स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेसाठीचा लिलाव( Pro kabaddi auction) मुंबईमध्ये सुरू आहे. या लिलावाच्या पहिल्या दिवशी (५ ऑगस्ट) अनेक स्टार खेळाडूंवर लाखोंची बोली लावण्यात आली. तमिळ थलायवासने (Tamil thalaivas) लिलावात पवन सेहरावतवर (Pawan sherawat) सर्वाधिक बोली लावली २.२६ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले. तर प्रदीप नरवालला यूपी योद्धाने केवळ ९० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

टॉप रेडर :

पवन सेहरावत - तमिळ थलायवास संघाने पवन सेहरावतला २.२६ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 विकास कंडोला - बेंगळुरू बुल्सने १.७० कोटी रुपयांची बोली लावून विकास कंडोलला आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 गुमान सिंग - गुमान सिंगला यू मुंबाने १.२२ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 प्रदीप नरवाल - प्रदीप नरवालला ९० लाखांची बोली लावून यूपी योद्धाने आपल्या संघात कायम ठेवले आहे. यापूर्वी यूपी योद्धा संघाने प्रदीपला विक्रमी १.६५ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले होते. मात्र गतवर्षी झालेल्या हंगामात त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. 

 सचिन - पटना पायरेट्सने ८१ लाखांची बोली लावून सचिनला आपल्या संघात स्थान दिले आहे.

टॉप डीफेंडर्स:

 फजल अत्राचली - अव्वल बचावपटूंच्या यादीत असलेल्या फजल अत्राचलीला पुणेरी पलटणने १.३८ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 सुनील कुमार - जयपूर पिंक पँथर्सने ९० लाखांची बोली लावून सुनील कुमारला आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 अमीर हसन बस्तामी - अमीर हसन बस्तामीवर हरियाणा स्टीलर्सने ६५.१० लाख रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 परवेश भेंसवाल - तेलुगू टायटन्सने परवेश भेंसवालवर ६२ लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 सुरजीत सिंग - तेलगू टायटन्सने सुरजीत सिंगवर ५० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले आहे.

टॉप अष्टपैलू खेळाडू :

 मोहम्मद इस्माईल नबीबक्ष - मोहम्मद इस्माईल नबीबक्षवर पुणेरी पलटणने ८७ लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 दीपक निवास हुड्डा - बंगाल वॉरियर्सने दीपक निवास हुडावर ४३ लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले आहे. 

 नितीन रावल - हरियाणा स्टीलर्सने नितीन रावलवर ३७.५० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले आहे.

 अरकम शेख - गुजरात जायंट्सने अरकम शेखवर ३२.१० लाखांची बोली लावत आपल्या संघात समावेश केला आहे. 

 रोहित गुलिया - रोहित गुलियावर ३० लाखांची बोली लावून पटना पायरेट्सने संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे.

लिलावाचा दुसरा दिवस शनिवारी (६ ऑगस्ट) पार पडणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required