IPLमध्ये RCBच्या जर्सीचा रंग का बदलतोय? कारण खरंच स्तुत्य आहे..

आयपीएल पुन्हा एकदा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पण यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आपल्या नेहमीच्या जर्सीत दिसणार नाही. यावेळी त्यांची जर्सी निळ्या रंगाची असेल. जर्सी बदलण्यामागे एक खास कारण आहे.

आरसीबी टीम नेहमी सामाजिक कारणांसाठी पुढे येताना दिसते. याआधी पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी म्हणून ते हिरवी जर्सी घालून मैदानावर उतरले होते. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ निळी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत त्यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. "२० सप्टेंबरला होणाऱ्या बँगलोर विरुद्ध कोलकाता सामान्यात फ्रंटलाईन वॉरीयर्सच्या सन्मानार्थ पीपीइ किटसारख्या निळ्या रंगाची जर्सी परिधान करून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देणाऱ्या कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत." असे ट्विट त्यांनी केले आहे.

कोहलीचा बंगळुरू हा संघ कधी नव्हे ते यंदा गुणतालिकेत आघाडीवर आहे. ७ पैकी ५ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे. आता यंदा तरी आरसीबीचे विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होते का याकडे आयपीएलप्रेमींचे लक्ष आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required