ॲरोन फिंचच्या निवृत्तीनंतर कोण होणार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? हे आहेत प्रबळ दावेदार...

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार (Australia) ॲरोन फिंच (Aaron finch) याने वनडे क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी (११ सप्टेंबर) तो न्यूझीलंड संघाविरुद्ध आपल्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. मात्र तो टी -२० क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. तसेच संघाचे नेतृत्व देखील करणार आहे. मात्र वनडे संघातून निवृत्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पुढील कर्णधार कोण? याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाहीये. दरम्यान आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत जे कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

पॅट कमिंस (Pat Cummins) :

ऑस्ट्रेलिया संघातील अष्टपैलू खेळाडू पॅट कमिंस हा सर्वोच्च स्थानी आहे. कारण पॅट कमिंस हा कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे पॅट कमिंस हा ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे नेतृत्व करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.

स्टीव्ह स्मिथ(Steve Smith) :

ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ हा दुसरा पर्याय आहे. अनुभवी स्टीव्ह स्मिथ ॲरोन फिंचची जागा घेऊ शकतो. यापूर्वी देखील त्याने ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र बॉल टेंपरिंग प्रकरण झाल्यानंतर त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याला वनडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn maxwell) :

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलिया संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. गेली अनेक वर्षे तो ऑस्ट्रेलिया संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. तसेच तो जगभरातील लीग स्पर्धा खेळताना दिसून येतो. या स्पर्धांमध्ये तो नेतृत्व करताना देखील दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा अनुभव पाहता, तो वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसून येतो.

ॲलेक्स कॅरी (Alex Carrey)

 ॲलेक्स कॅरी देखील ऑस्ट्रेलिया संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे जो ॲरोन फिंचने स्थान घेऊ शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या मालिकेत जेव्हा ॲरोन फिंच दुखापतग्रस्त झाला होता त्यावेळी कमिंसच्या अनुपस्थितीत ॲलेक्स कॅरीने संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला होता.

ॲरोन फिंचने १४५ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्याने ३९.१५ च्या स्ट्राईक रेटने ५४०१ धावा केल्या होत्या.

सबस्क्राईब करा

* indicates required