रिकी पाँटिंगने विराटबाबत केले मोठे वक्तव्य, "टी -२० वर्ल्ड कप साठी स्थान नाही मिळालं तर..."

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. तब्बल ३ वर्षे उलटून गेली आहेत, त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. हेच कारण आहे की, अनेक क्रिकेट चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटू त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. जेव्हा चांगली कामगिरी करत असलेला खेळाडू अचानक फ्लॉप होतो तेव्हा त्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. सध्या विराट कोहली देखील याच परिस्थितीचा सामना करत आहे.

यादरम्यान विराट कोहलीला अनेक दिग्गज समर्थन करताना देखील दिसून आले आहेत. नुकताच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने देखील विराट कोहली बाबत मोठे वक्तव्य केले आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराहची पत्नी आणि प्रेसेंटर संजना गणेशन रिकी पाँटिंगची मुलाखत घेताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना दिसून येत आहेत. रिकी पाँटिंगने याबाबत बोलताना म्हटले की, "जर मी विरोधी संघाचा कर्णधार असतो, तर मला भारतीय संघाविरुद्ध खेळताना भीती वाटली असती. कारण भारतीय संघात विराट कोहली आहे. मला माहीत आहे की, सध्या फॉर्ममध्ये नाहीये. प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजासोबत हे होतं."

तसेच तो पुढे म्हणाला की, "जर मी भारतीय संघात असतो तर, विराट कोहलीवर असलेला दबाव कमी केला असता. मी प्रयत्न केला असता की, विराट कोहलीला मनमोकळ खेळता आलं पाहिजे. त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतो. जर त्याला टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान नाही मिळालं तर, त्याला भारतीय संघात पुनरागमन करणं कठीण होऊन जाईल."

विराट वाईट कामगिरी करत असला तरीदेखील अनेक दिग्गज खेळाडू त्याला समर्थन करत आहेत. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम, रोहित शर्मा, सुनील गावस्कर, जोस बटलर यांनी त्याला समर्थन केलं आहे. काही दिवसांपूर्वी बाबर आजमने ट्विट करत लिहिले होते की, "ही वेळ देखील निघून जाईल.." तसेच रोहित शर्माने देखील म्हटले होते की, विराट लवकरच पुनरागमन करेल.."

सबस्क्राईब करा

* indicates required