एकेकाळी केली होती झाडू मारण्याची नोकरी आता विस्फोटक फलंदाजी करत मिळवून दिला केकेआरला विजय, पाहा रिंकू सिंगच्या संघर्षाची कहाणी

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेत सोमवारी (२ मे ) एक रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने जिंकला यासह दोन गुणांची कमाई देखील केली. या सामन्यानंतर एक खेळाडूची जोरदार चर्चा सुरू आहे, तो खेळाडू म्हणजे डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग. सोमवारी पार पडलेल्या या सामन्यात रिंकू सिंगने (Rinku Singh) विस्फोटक फलंदाजी केली आणि नाबाद राहून कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. या मॅचविनर खेळाडूची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

रिंकू सिंगच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर, ५ भावंडांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे वडील गॅस सिलेंडर घरोघरी पोहचवण्याचे काम करायचे. तर एक भाऊ ऑटो रिक्षा चालवायचा आणि दुसरा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करायचा. तसेच रिंकू सिंगच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, तो नववीला असताना नापास झाला होता. शिक्षण कमी असल्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. खूप प्रयत्न केल्यानंतर त्याच्या भावाने त्याला नोकरी मिळवून दिली. परंतु शिक्षण कमी असल्यामुळे त्याला झाडू मारण्याची नोकरी मिळाली होती.

या कठीण काळात देखील त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून ठेवलं होतं. २०१५ मध्ये एकवेळ अशी आली होती, ज्यावेळी त्याच्या कुटुंबावर ५ लाखांच कर्ज भरण्याची वेळ आली होती. युपीच्या १९ वर्षाखालील संघातून खेळताना त्याला भत्ता मिळायचा. याच पैशातून त्याने कर्ज फेडले होते. २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला पंजाब संघाने १० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. २०१८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ८० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. तसेच या हंगामात त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. आतापर्यंत तो आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला होता. सध्या तो फलंदाजीमुळे चर्चेत आला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required