computer

जेव्हा जिंकणारा हरणाऱ्याला जिंकवतो.... २०१२ सालच्या स्पेन स्पर्धेतली ही गोष्ट ठाऊक आहे?

कुठल्याही खेळात विजय हा सर्वात महत्त्वाचा असतो. विजय मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे खेळाडू आपण पाहत असतो. समोरचा खेळाडू केव्हा चूक करतोय आणि त्याचा आपण कसा फायदा उचलायचा याच्याच बेतात खेळाडू दिसतात. पण आज आम्ही अशा एका खेळाडूची गोष्ट सांगणार आहोत ज्याने समोरचा खेळाडू चुकला म्हणून विजेतेपद सोडत त्याला विजयीकेलं होतं. 

२०१२ साली स्पेन येथे एक धावण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. स्पेनचा इव्हान फर्नांडिज आणि केनियाचा अबेल मुताई हे दोन्ही सर्वात पुढे धावत होते. हा सामना अबेल जिंकेल असे वाटत असतानाच त्याचा गैरसमज झाला. खरे तर अबेलला स्पॅनिश भाषा कळत नसल्याने त्याला फलकांवर लिहिलेली सूचना समजली नाही. त्याला वाटले की आपण जिंकलो आणि तो अंतिम रेषेच्या १० मीटर आधीच थांबला. आता इव्हानने ठरवले असते तर तो हा सामना जिंकू शकला असता.

पण पठ्ठ्या मात्र भलताच प्रामाणिक निघाला. त्याने ही संधी न साधता, उलट अबेलला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि त्याला अक्षरशः पुढे ढकलून स्पर्धा पूर्ण करायला लावली. गोष्ट तशी छोटी आहे. पण खूप मोठा संदेश देणारी आहे.

कालपासून ऑलिम्पिक स्पर्धेच्या नावाने ही गोष्ट फिरत आहे. गोष्ट जरी ऑलिम्पिकची नसली तरी मात्र जगाला मोठा धडा देणारी आहे. या स्पर्धेत विजेता जरी अबेल मुताई ठरला तरी हिरो मात्र इव्हान ठरला. दरवर्षी अनेक खेळाडू अनेक पदके जिंकत असतात. पण इव्हानने मात्र आपल्या प्रामाणिकपणामुळे इतिहासात आपले वेगळे ठसठशीत स्थान निर्माण केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required