computer

सचिन त्याच्या पहिल्या कारला मिस करतोय...त्याने चाहत्यांना काय आवाहन केलंय पाहा!!

माणसाच्या आयुष्यात जे जे पहिल्यांदा येते त्याबद्दल त्याच्या मनात कमालीचे प्रेम असते. लहानपणी घेतलेली पहिली सायकल, पहिली बाईक, स्वतःच्या कमाईने घेतलेली कार अशा गोष्टींबद्दल माणूस हळवा असतो. हे फक्त सामान्यांबद्दल लागू आहे असे समजत असाल तर असं नक्कीच नाहीय.

अनेक सेलेब्रिटींनाही आपल्या पहिल्या घेतलेल्या वस्तू विकताना त्रास होत असतो. आपला मास्टर ब्लास्टर सचिन किती हळव्या मनाचा आहे हे तर सर्वच जाणतात. तर सचिन आपल्या पहिल्या कारला खूप मिस करतोय...

लहान असताना भाऊ अजितसोबत बाल्कनीतुन भारी भारी कार्स बघताना एक दिवस स्वतःची कार असेल अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. जसा तो मोठा झाला तशा त्याने अनेक भारी कार्स त्याच्या ताफ्यात जमा केल्या. अगदी फेरारीचासुद्धा त्यात समावेश आहे.

पण सचिनचा जीव मात्र अडकला आहे त्याच्या पहिल्या मारुती 800 मध्ये. इन द स्पोर्टलाईट नावाच्या शोमध्ये मुलाखत देताना त्याने त्याची ही भावना बोलून दाखवली. "माझी पहिली कार मारुती 800 आता माझ्यासोबत नाही. मला ती पुन्हा हवीय, जर कुणी ती परत मिळवून देऊ शकत असेल तर त्याने माझ्याशी संपर्क करावा." हे त्याचे शब्द!!

तर कुणाला सचिनच्या या पहिल्या वहिल्या कारबद्दल माहीत असेल तर नक्की संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्यानिमित्ताने त्याच्याशी भेट देखील होऊ शकते

सबस्क्राईब करा

* indicates required