सचिनला डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहायचं आहे? मग हा व्हिडिओ नक्की पाहा...

मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तुम्ही कोणालाही विचाराल की, सचिन डाव्या हाताने फलंदाजी करतो की उजव्या हाताने? तर समोरचा व्यक्ती क्षणही न दवडता उत्तर देईल आणि म्हणेल की, सचिन उजव्या हाताने फलंदाजी करतो. मात्र सचिनला कधी डाव्या हाताने शॉट खेळताना पाहिलं आहे का? नाही ना? मग एकदा पाहाच.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो. तो आपल्या दैनंदिन जीवनातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोल्फ खेळताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ आरशाकडे कॅमेरा ठेवून शूट करण्यात आला आहे. त्यामुळे असे वाटत आहे की, सचिनने डाव्या हाताने हा शॉट खेळला आहे. १० सेकंदाच्या या व्हिडिओला सचिनने हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले की, "हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहेत, ज्यांना मला डाव्या हाताने खेळताना पाहायचं आहे.

क्रिकेट प्रमाणेच सचिनला गोल्फ खेळायला देखील खूप आवडतं. तो अनेकदा गोल्फ खेळताना दिसून आला आहे. त्याने गोल्फ खेळत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापूर्वी तो माजी भारतीय फलंदाज युवराज सिंग तसेच वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारासोबत गोल्फ खेळताना दिसून आला आहे. क्रिकेट आणि गोल्फ सह सचिनला आणखी एक खूप आवडतो, तो म्हणजे टेनिस. सचिनने अनेकदा विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

सचिन तेंडुलकर बद्दल बोलायचं झालं तर, सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम देखील सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने एकूण १०० शतके झळकावली आहेत. तर २०१३ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळताना दिसून आला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required