या देशात पार पडणार आशिया चषक २०२२ स्पर्धा, समजून घ्या कसे असेल स्पर्धेचे स्वरूप...

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धा कुठे आणि कधी सुरू होणार? अनेकांना हा प्रश्न पडला होता. तुम्हाला ही पडला असेल. यापूर्वी असे म्हटले जात होते की, स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे असल्यामुळे ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. मात्र श्रीलंका सध्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. त्यामुळे ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार नाही, हे तर निश्चित आहे. आता या स्पर्धेच्या आयोजनाबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

ही स्पर्धा श्रीलंकेत नव्हे तर संयुक्त अरब अमिरात यूएई (UAE) मध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभाग घेणार आहेत. तसेच या स्पर्धेची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी देखील आशिया चषक स्पर्धेचे आयोजन टी -२० स्वरूपात करण्यात येणार आहे.

या संघांमध्ये पार पडणार क्वालिफायरचे सामने

आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी ५ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. तर ६ वा संघ क्वालिफायरचे सामने जिंकून येणार आहे. क्क्वालिफायर फेरीत ४ संघ आमने सामने येणार आहेत. हे सामने २४ ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत.

तसेच २७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश संघाने क्वालिफाय केले आहे. तर क्वालिफायर फेरीत यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग हे संघ आमने सामने येणार आहेत. यापैकी एक संघ ६ संघांमध्ये प्रवेश करेल.

सबस्क्राईब करा

* indicates required