काय सांगता!! कारगिल युद्धात भारतावर आक्रमण करण्यासाठी शोएब अख्तर युद्धभूमीवर उतरणार होता. स्वतः केला खुलासा...

कारगिल विजय (Kargil Vijay diwas) मिळवून आज (२६ जुलै) २३ वर्षं पूर्ण झाली आहेत. १९९९ मध्ये भारत आणि शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. या युद्धात २६ जुलै रोजी भारताने पाकिस्ताची सैन्याला धूळ चारत वाजवत तिरंगा फडकवला (Kargil war) होता. या युध्दाचे परिणाम क्रिकेटवर देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. भारत आणि पाकिस्तान या देशांतील दौरे बंद झाले होते. मात्र भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने येतात त्यावेळी स्टेडियममधील वातावरण युद्धभूमी पेक्षा कमी नसतं. दोन्ही खेळाडूंना पराभव मान्य नसतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, कारगिल युद्धात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) देखील भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत होता? होय, अनेकांना ही बाब माहीत नसेल मात्र शोएब अख्तरने स्वतः याबाबत खुलासा केला होता.

कारगिल युद्ध हे १९९९ मध्ये मे ते जुलै महिन्या दरम्यान घडले होते. यात भारत आणि पाकिस्तानातील हजारो सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हे युद्ध होऊन २३ वर्षं होऊन गेली आहेत. आता शोएब अख्तरने खुलासा केला आहे की, तो देखील हे युद्ध लढण्यासाठी तयार होता.

शोएब अख्तरने एआरवाय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "खूप कमी लोक आहेत ज्यांना माहीत असेल की, मी कारगिल युद्धात भारतासोबत लढण्यासाठी नॉटिंगहॅमशायर या इंग्लंडच्या काउंटी संघाकडून मिळालेली १ कोटी १६ लाख रुपयांहून अधिकची ऑफरही नाकारली होती."

तसेच तो पुढे म्हणाला की, युद्धात सहभागी होण्यासाठी शोएब अख्तर आणि पाकिस्तानच्या जनरलचं बोलणं देखील झालं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की, युद्ध लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे एकत्र लढू आणि एकत्र मरण आलं तरी हरकत नाही. युद्धात सहभागी होण्यासाठी त्याने कोट्यावधींची ऑफर नाकारली होती.

शोएब अख्तरने केलेल्या या खुलाशानंतर नक्कीच भारतीय क्रिकेट चाहते संतापले असतील. तो क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध खेळताना नेहमी आक्रमक असायचा. मात्र क्रिकेटच्या बाहेर युद्धभूमीत देखील तो भारतीय संघावर आक्रमण करण्याची वृत्ती बाळगतो हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याने जेव्हा पाकिस्तान संघासाठी पदार्पण केले होते. त्यावेळी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) गॉड ऑफ क्रिकेट असे म्हटले जायचे. मात्र शोएब अख्तरला त्याला पहिल्याच चेंडूवर बाद करायचं होतं. त्याने हे करून देखील दाखवलं होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required