computer

ताम्हिणी घाटात टीम इंडीयाची ट्रेकिंग : पाहा कशी रंगली मोहिम

        २३ फेब्रुवारीला सुरू झालेला भारत - अॉस्ट्रेलीया यांच्यातला पहिला कसोटी सामना तिसर्‍या दिवशीच गुंडाळला गेला तो भारतीय संघाच्या दणदणीत पराभवामुळे. विराटच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या विजयी घौडदौडीला अखेर पराजयाचा लगाम लागला. तिसर्‍या दिवशीच सामना संपल्यामुळं हातात आणखी दोन दिवस रिकामे तर होतेच. सोबत पराभवामुळे टीमला इंडीयाला आलेलं नैराश्यही झटकायचं होतं. यासाठी कोच अनिल कुंबळेनी पुण्यातल्या दोन मित्रांच्या सहाय्यानं खास ताम्हिणी घाटात टीमसाठी ट्रेकिंगचा बेत आखला. ट्रेकींगचं ठिकाण होतं गरूड माची. 

 

                

सेल्फी !!

गरूड माचीवर अगोदच 'हाय प्लेसेस'ची टीम हजर होती. एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि हाय प्लेसेसचे संचालक वसंत वसंत लिमये यांना टीम इंडीयाचा बेत कळाला, तशी लागलीच त्यांनी योग्य ती व्यवस्था कार्यरत केली. इथल्या कर्मचारी वर्गानेही टीमला फोटो कींवा सह्या मागून त्रास दिला नाही. रविवारी संध्याकाळी इथं पोहोचलेल्या भारतीय संघाने डोंगरमाथ्यातला विलोभनीय सुर्यास्त पाहीला. अंधारात ट्रेझर हंट खेळून गडद अंधारातही मजा केली. आणि चांदण्यांच्या सहवासात भोजन, शेकोटी, गाण्यांचा कार्यक्रमही आटोपला.

 

अजिंक्य राहाणे आणि उमेश यादव ट्रेकसाठी सपत्नीक !!

 दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी टीम इंडीयाने सुरेंद्र चव्हानांसोबत ट्रेकिंगचा थरार अनुभवला. कोवळ्या सुर्यकिरणांना अंगावर घेत खेळाडुनी 'कॅमल बॅक' ची चढाई पूर्ण केली आणी माथ्यावर जाऊन तिरंग्यासोबत फोटो टिपले.. उंचावरून दिसणारा मनोरम्य परिसर डोळ्यात भरून घेतला.

 

रवींद्र जडेजा

कॅप्टन कोहली

खेळ आणि सरावापासून थोडी विश्रांती घेऊन मनाला ताजंतवानं करण्यासाठी आलेली ही मंडळी ताम्हिणी घाटाच्या कुशीत येऊन भलतीच खुश झाली. कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे राबवलेली ही योजना विना अडचण यशस्वी झाली.  

सो... आजच्या मॅचसाठी टीम इंडिया बंगळुरूला पोहोचलीय. तेव्हा आपल्या टीमला बोभाटाकडून अॉल दी बेस्ट!!

सबस्क्राईब करा

* indicates required