टी -२० क्रिकेटमधील ३ विस्फोटक फलंदाज जे ख्रिस गेलचा वारसा पूढे घेऊन जाऊ शकतात..

टी -२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज कोण? असं विचारलं तर एक नाव चटकन लक्षात येतं ते म्हणजे युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल. ख्रिस गेलने (Chris Gayle) आतापर्यंत जगभरातील अनेक लीग स्पर्धा खेळल्या आहेत. अनेक युवा आणि वरिष्ठ खेळाडूंसोबत त्याने ड्रेसिंग रूम शेअर केले आहे. गोलंदाज कोणीही असो, ख्रिस गेलला चेंडू स्टेडियमच्या बाहेर कसा पाठवायचा हे चांगलंच माहीत आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो खेळताना दिसून येत नाहीये. आयपीएल २०२२ स्पर्धेत देखील त्याने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा ३ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, जे येणाऱ्या काळात ख्रिस गेलचा टी -२० क्रिकेटमधील वारसा पूढे घेऊन जाऊ शकतात. चला तर पाहुया.

) लियाम लिविंगस्टन (Liam Livingston) :

 लियाम लिविंगस्टनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून एक वर्ष झाला आहे. मात्र कमी वयात त्याने भरपूर नाव कमावले आहे.  लियाम लिविंगस्टन देखील ख्रिस गेल प्रमाणेच चेंडू स्टेडियमच्या बाहेर पोहचवण्यात तरबेज आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारला होता. तसेच त्याच्या टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २० सामन्यांमध्ये १६६.९० च्या स्ट्राइक रेटने ३४२ धावा केल्या आहेत. तसेच ख्रिस गेल प्रमाणेच तो फिरकी गोलंदाजी देखील करतो.

) रोमेन पॉवेल (Rovman Powell) :

या यादीत दुसऱ्या स्थानी आहे वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज रोमेन पॉवेल. हा फलंदाज देखील आपल्या हार्ड हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो चांगल्याच फॉर्ममध्ये असून तुफान फटकेबाजी करत आहे. त्याची फलंदाजी शैली पाहून कोणीही म्हणेल की, तो ख्रिस गेल सारखी फलंदाजी करतोय. टी -२० क्रिकेटमधील त्याची आक्रमक फलंदाजी पाहता असे वाटू लागले आहे की, तो ख्रिस गेलचा टी -२० क्रिकेटमधील वारसा पूढे घेऊन जाऊ शकतो.

) ईशान किशन (Ishan kishan) :

ईशान किशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका असे म्हटले जाते. अगदी कमी वयात या फलंदाजाने दिग्धा गोलंदाजांचे चेंडू स्टेडियमच्या बाहेर पोहचवले आहेत. अवघ्या १८ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ५३२ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी अनेकदा महत्वपूर्ण खेळी  केली आहे. ही कामगिरी पाहता, ईशान किशन देखील ख्रिस गेलचा टी -२० क्रिकेटमधील वारसा पुढे घेऊन जाऊ शकतो. 

काय वाटतं? या ३ फलंदाजांपैकी कुठला फलंदाज भविष्यात ख्रिस गेल सारखी आक्रमक फलंदाजी करू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required