सुरुवातीच्या २५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या फलंदाजांनी मारले आहेत सर्वाधिक षटकार...

भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) हाँगकाँग विरुध्द झालेल्या सामन्यात जोरदार खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला आशिया चषक २०२२ स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाहीये. श्रीलंका आणि पाकिस्तान विरुध्द झालेल्या लागोपाठ पराभवामुळे भारतीय संघ आता आशिया चषक २०२२ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सूर्यकुमार यादवने मिस्टर ३६० म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तो मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात षटकार मारण्यात तरबेज आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीच्या २५ सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.

) सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav

सूर्यकुमार यादव या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत खेळलेल्या २७ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४४ षटकार मारले आहेत. तसेच फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत ८०५ धावा केल्या आहेत. अवघ्या काही सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने इंग्लंड विरुध्द शतक झळकावले होते. तर हाँगकाँग विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने तुफानी खेळी केली होती.

) केएल राहुल (KL Rahul) :

भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल आशिया चषक २०२२ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याच्या या फ्लॉप कामगिरीमुळे अनेकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. त्याने आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुरुवातीच्या २५ सामन्यांमध्ये ४२ षटकार मारले होते. तसेच त्याच्या टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६० सामन्यांमध्ये ७७ षटकार मारले आहेत. यासह त्याने २ शतके देखील झळकावली आहेत.

) युवराज सिंग (Yuvraj Singh) :

युवराज सिंग हा टी -२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाने २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. या स्पर्धेत युवराज सिंगने जोरदार कामगिरी केली होती. त्याने आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुरवातीच्या २५ सामन्यांमध्ये ४१ षटकार मारले होते. तसेच त्याने एकूण ५८ सामन्यांमध्ये ७४ षटकार मारले होते.

काय वाटतं? सूर्यकुमार यादव, युवराज सिंगचा सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम मोडू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required