वनडे क्रिकेटच्या एकाच वर्षात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज; केवळ एकाच भारतीयाचा समावेश...

क्रिकेट हा खेळ सुरू होऊन अनेक वर्षे झाली आहेत. सुरुवातीला जेव्हा हा खेळ सुरू झाला तेव्हा, केवळ कसोटी क्रिकेट खेळले जायचे. त्यानंतर क्रिकेटमध्ये क्रांती घडली आणि वनडे क्रिकेटचा अविष्कार झाला. १९७२ मध्ये पहिला वनडे सामना पार पडला. ५ जानेवारी १९७२ रोजी मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यानंतर अनेक खेळाडू आले आणि गेले. अनेक खेळाडूंनी अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. मात्र तुम्हाला माहीत आहे का?वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम कुठल्या गोलंदाजाच्या नावावर आहे? नाही ना? चला तर जाणून घेऊया.

) अनिल कुंबळे (Anil Kumble) :

अनिल कुंबळे हे भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे चौथ्या स्थानी आहेत. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर अनिल कुंबळे यांनी अनेक फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यांनी १९९६ मध्ये अप्रतिम कामगिरी करत एकाच वर्षात ३२ वनडे सामने खेळत ६१ गडी बाद केले होते. यादरम्यान १२ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

) शेन वॉर्न (Shane Warne) :

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शेन वॉर्नच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. बॉल ऑफ द सेंच्युरी टाकण्याचा पराक्रम शेन वॉर्नने केला होता. तसेच १९९९ मध्ये त्याने एकूण ३७ वनडे सामने खेळले होते. ज्यात त्याने ६२ गडी बाद केले होते.

) सईद अजमल ( Saeed Ajmal) :

पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू सईद अजमल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आपल्या ॲक्शनमुळे तो अनेकदा आयसीसीच्या रडारवर आला होता. अनेकदा त्याच्या ॲक्शनवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले गेले होते. त्याने २०१३ मध्ये ३३ वनडे सामन्यांमध्ये ६२ गडी बाद केले होते. सध्या तो वनडे क्रिकेटमध्ये एकाच वर्षी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

) सकलेन मुश्ताक (Saklain mushtaq) :

या यादीत पहिल्या स्थानी आहे, पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक. त्याने सलग २ वेळेस हा पराक्रम केला होता. त्याने १९९६ मध्ये ३३ वनडे सामन्यांमध्ये ६५ गडी बाद केले होते. तर १९९७ मध्ये ३६ सामन्यांमध्ये ६९ गडी बाद केले होते. 

काय वाटतं? जसप्रीत बुमराह हा विक्रम मोडू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required