टी -२० WC स्पर्धेत या गोलंदाजांचा राहिलाय बोलबाला! पाहा सर्वाधिक गडी बाद करणारे टॉप - ५ गोलंदाज..

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ (Icc T-20 world cup) स्पर्धा सुरू व्हायला काही महिने शिल्लक राहिले आहेत. येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. टी -२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, या फॉरमॅटमध्ये फलंदाजांचा बोलबाला असतो. फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून अनेक विक्रम बनवले आहेत. तर गोलंदाज देखील मागे नाहीये. या फॉरमॅटमध्ये गोलंदाज देखील सामना जिंकून देत असतात. आज आपण अशा गोलंदाजांबद्दल बोलणार आहोत, ज्या गोलंदाजांनी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले आहेत. चला तर पाहूया यादी. (most wickets in T-20 world cup) 

) शाकिब अल हसन (Shakib Al Hasan ) :

 टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शाकिब अल हसन सर्वोच्च स्थानी आहे. बांगलादेश संघासाठी त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेत त्याने गोलंदाजी करताना ३१ सामन्यातील ३० डावात १७.२९ च्या सरसरीने ४१ गडी बाद केले आहेत.

) शाहिद आफ्रिदी (shahid Afridi) :

या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, पाकिस्तान संघातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी. पाकिस्तान क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदने मोलाचे योगदान दिले आहे. त्याने २००७ पासून ते २०१६ पर्यंत खेळलेल्या टी -२० विश्वचषकातील ३४ सामन्यांमध्ये २३.२५ च्या सरासरीने ३९ गडी बाद केले आहेत.

) लसिथ मलिंगा (lasith malinga) :

टी -२० क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांचा उल्लेख होतो त्यावेळी लसिथ मलिंगा हे नाव आवर्जून घेतलं जातं. टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. २००७ पासून ते २०१४ पर्यंत खेळलेल्या ३१ सामन्यांमध्ये त्याने २०.३८ च्या सरासरीने ३८ गडी बाद केले आहेत.

) सईद अजमल ( saeed ajmal) :

या यादीत चौथ्या स्थानी आहे, पाकिस्तान संघाचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमल. सईद अजमलने पाकिस्तान संघासाठी खेळताना २००९ पासून ते २०१४ पर्यंत २३ सामन्यांमध्ये १८.६८ च्या सरासरीने ३६ गडी बाद केले होते.

)अजंता मेंडिस (Ajanatha mendis) :

या यादीत पाचव्या स्थानी आहे,श्रीलंका संघातील गोलंदाज अजंता मेंडिस. या फलंदाजाने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेत त्याने २००९ पासून ते २०१४ पर्यंत २१ सामने खेळताना १५.०२ च्या सरासरीने ३५ गडी बाद केले होते.

काय वाटतं? कुठला भारतीय गोलंदाज आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required