computer

चक्क रस्सीखेच खेळ ऑलेम्पिकमध्ये होता? हा खेळ केव्हा आणि का बंद का पडला?

शाळेत असताना सर्रास खेळला जाणारा खेळ म्हणजे रस्सीखेच. रस्सीखेच जिंकण्यासाठी ताकद लागते. मग खेळ असो की आयुष्य हे शिकवणारा हा खेळ तसा लोकप्रिय असला तरी खेळाच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे या खेळाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. मात्र एक वेळ अशी होती, जेव्हा हा खेळ चक्क ऑलिम्पिकमध्ये खेळला जात होता.

१९०० सालापासून रस्सीखेचचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होता. १९२० सालापर्यंत ऑलिम्पिकमध्ये रस्सीखेच खेळला जात असे. १९१६ सालचा अपवाद सोडला तर १९२० पर्यन्त सर्वच ऑलिम्पिक्समध्ये हा खेळ होता. पहिल्या दोन ऑलिम्पिकमध्ये ५ किंवा ६ खेळाडू मिळून संघ बनवत असत. १९०८ साली ही संख्या आठ झाली.

रस्सीखेच आपण शाळेत खेळायचो त्याच पद्धतीने खेळला जात असे. ८ लोकांच्या संघाने दुसऱ्या संघाला ६ फुटांपर्यंत ओढले तर तो जिंकला असा नियम होता. तेव्हाही विविध देशांचे विविध संघ यात सहभागी होत असत.

पण रस्सीखेच हा खेळ मात्र बऱ्याचशा वादांमध्ये अडकत असे. १९०८ सालच्या ऑलीम्पिकमध्ये अमेरिकन संघाने आरोप केला की ब्रिटिश संघातील लिव्हरपुल पोलीस संघाने घातलेल्या बुटांमध्ये जास्त घर्षण होते. अमेरिकेने मग या खेळातून काढता पाय घेतला, तर तीन संघ सहभागी असलेला ब्रिटन मात्र सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही पदकांचा मानकरी ठरला.

१९१२ साली तर जवळपास सर्वच देशांनी रस्सीखेचमधून अंग काढून घेतले. त्यावर्षी फक्त एकच सामना या खेळातून होऊ शकला. ग्रेट ब्रिटन आणि स्वीडन या दोन देशांमध्ये तो सामना पार पडला होता. हा सामना स्वीडनने जिंकला होता. तेव्हापासून बंद पडलेला हा खेळ अजूनही बंदच आहे.

"असा कोणता खेळ आहे जो जिंकण्यासाठी मागे जावे लागते?" या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहित असतं, पण पटकन आठवतंच असं नाही. हे उत्तर आहे-रस्सीखेच!! हा खेळही एकेकाळी ऑलिम्पिक खेळांचा भाग होता ही रंजक गोष्ट आहे!!

सबस्क्राईब करा

* indicates required