भेटा टेनिस चॅम्पियन सुप्पर आजींना !!

राव, आज भेटूयात एका सुप्पर आज्जींना. या आजींच वय आहे ६९. पण जरी यांनी साठी ओलांडली असली तरी या एखाद्या तरुणी सारख्या धुवांधार टेबल टेनिस खेळतात भाऊ.

क्रिकेट सोडलं तर भारतीयांनी इतर खेळाकडे दुर्लक्षच केल्याचं दिसून येतं. असं असताना या आजी टेबल टेनिस सारखा खेळ त्याच आवडीने खेळताना दिसतायत. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय आणि तो तुफान गाजतोय. पण कोण आहेत या आजी ?

या आहेत कर्नाटक मधील एकेकाळच्या टेबल टेनिस चॅम्पियन ‘सरस्वती राव’. या वयातही त्याच जोशाने टेबल टेनिस खेळताना त्या दिसतात मग विचार करा तरुणपणात त्यांनी काय कमाल केली असावी.
मंडळी या सुप्पर आज्जींना बोभाटाचा कडक सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required