व्हायरल व्हिडीओ: ही आहे WWE च्या आखाड्यात उतरणारी पहिली भारतीय महिला कविता देवी

Subscribe to Bobhata

भाऊ, भारतीय लोकांमध्ये कुस्ती लै पॉप्युलर आहे आणि याच पॉप्युलरीटीचा फायदा WWEअनेक वर्षे घेत आहे. पण तस बघायला गेलं तर फार कमी भारतीय लोकांनी यामध्ये भाग घेतलाय, द ग्रेट खली हा कदाचित सगळ्यात प्रसिद्ध खेळाडू असेल.  पण सतत होणाऱ्या दुखापतींमुळं त्याचं करियर पण फार जास्त काळ टिकलं नाही. 

तर आता खलींन भारतात एक ट्रेनिंग अकॅडमी चालू केली आहे आणि त्यातूनच काही भारतीय खेळाडूंना WWE मध्ये अनेक  संधी मिळवून द्यायचा त्याचा प्लॅन आहे. कविता देवी ही त्याच्याच अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेऊन तयार झालेली आहे.

या व्हडिओमध्ये न्यूझीलंडच्या डकोटा काई विरुद्ध ती खेळताना दिसते. गम्मत म्हणजे ती चक्क पंजाबी ड्रेस घालून इथे कुस्ती खेळतेय. कविता देवीने पूर्ण सामन्यावर पकड ठेवली होती पण शेवटी काई पुढे तिचा निभाव लागला नाही.

पण एकूणच अनेक चा भारताकडचा कल आणि जिंदर महेल, आणि संजय दत्त यांसारख्या खेळाडूप्रमाणे कविता देवीला सुद्धा अजून संधी मिळेल असे वाटते.

सबस्क्राईब करा

* indicates required