शतक एक विक्रम अनेक!! ७१ वे शतक झळकावत विराटने पाडला विक्रमांचा पाऊस; रोहीतलाही टाकले मागे...

आशिया चषक २०२२(Asia Cup 2022) गुरुवारी (८ सप्टेंबर)भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गेल्या १०२० दिवसांपासून क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण याच सामन्यात पाहायला मिळाला. विराट कोहलीने या सामन्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. हे शतक खूप खास आहे. कारण हे शतक झळकावण्यासाठी त्याला अनेक महिने वाट पाहावी लागली आहे. दरम्यान या शतकी खेळी सह त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

रोहित शर्माला सोडलं मागे..

अफगाणिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. त्याने मैदानावर येताच तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक झळकावले. यासह तो टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले आहे. विराट कोहलीने ३३ वेळेस हा पराक्रम केला आहे. तर रोहित शर्माला २२ वेळेस हा पराक्रम करण्यात यश आले होते.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा..

विराट कोहली : ३३

 रोहित शर्मा : ३२

 बाबर आझम : २७

 डेविड वॉर्नर: २३

 मार्टिन गप्टिल: २२

सिक्सर किंग विराट..

विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात फलंदाजीला येताच षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली. या सामन्यात त्याने एकूण १२ चौकार आणि ६ षटकार मारले. यासह तो टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत एकूण १७१ षटकार मारले आहेत. या यादीत सर्वोच्च स्थानी मार्टिन गप्टील आहे. ज्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७२ षटकार मारले आहेत. 

तसेच रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर, ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर, ओएन मॉर्गन चौथ्या क्रमांकावर आणि ॲरॉन फिंच पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय विराट कोहली टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५०० धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्माने हा पराक्रम केला होता.

विराट कोहलीचे हे शतक खूप खास आहे. कारण विराटने शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नव्हते. आगामी आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेपूर्वी विराटचे जोरदार शतक ही बाब भारतीय संघासाठी नक्कीच सकारात्मक बाब आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required