वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी! भारत नाही तर 'हा' संघ पटकावणार Asia Cup 2022 स्पर्धेचे जेतेपद...

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022 स्पर्धेतील सुपर -४ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या फेरीत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर आता दुसऱ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात पराभूत झाल्यास भारतीय संघ आशिया चषक २०२२ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. दरम्यान या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) विजेत्या संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

वीरेंद्र सेहवागने क्रिकबझवर बोलताना म्हटले की, "जर भारतीय संघाने आणखी एक सामना गमावला तर भारतीय संघ या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. तर पाकिस्तान संघ सध्या फायद्यात आहे. कारण एक सामन्यात पराभव झाला तर आणखी एक सामना जिंकून नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तान संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. कारण त्यांनी एक सामना गमावला असेल आणि दोन सामन्यात विजय मिळवला असेल. भारतीय संघाने आणखी एक सामना गमावला तर भारतीय संघ बाहेर होऊ शकतो कारण भारतीय संघाने एक सामना गमावला आहे.

तसेच तो पुढे म्हणाला की, "पाकिस्तान संघ खूप वर्षांनंतर अंतिम सामना खेळणार आहे. तसेच खूप वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे वर्ष पाकिस्तानचे असू शकते." पाकिस्तान संघाने शेवटचा अंतिम सामना २०१४ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाला श्रीलंका संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाने ७ वेळेस, श्रीलंका संघाने ५ तर पाकिस्तान संघाने केवळ २ वेळेस आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे.

अशी असेल भारतीय संघासाठी अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची वाट..

 भारतीय संघाला जर अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर ६ सप्टेंबर रोजी श्रीलंका संघाला पराभूत करावे लागेल. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात अफगानिस्तान संघाला देखील पराभूत करावे लागेल. असे झाले तर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत - पाकिस्तान संघ आमने सामने येऊ शकतात. असे झाले तर ही भारत आणि पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी ठरू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required