क्रिकेट इतिहासातील अनोखा सामना; जेव्हा एकाच सामन्यात तब्बल १२ खेळाडूंनी केले होते पदार्पण...

क्रिकेटमध्ये नवख्या खेळाडूने पदार्पण करणं वेगळी गोष्ट नाहीये. मात्र आजवर तुम्ही एक, दोन किंवा तीन खेळाडूंना एकाच सामन्यात पदार्पण करताना पाहिलं असेल. मात्र एकाच सामन्यात १२ खेळाडूंनी पदार्पण केलं, असं कधी ऐकलंय का? नाही ना? मात्र बोभाटाच्या आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका रोमांचक सामन्याबद्दल माहिती देणार आहोत, ज्या सामन्यात १२ खेळाडूंनी एकत्र पदार्पण केले होते.

हा किस्सा ७५ वर्षांपूर्वी घडला होता. तर झाले असे की, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमने सामने होते. १९४८ साली दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होता. हा सामना आजच्याच दिवशी म्हणजे २१ जानेवारी रोजी सुरू झाला होता. या सामन्यात खेळलेले काही खेळाडू गायब झाले. तर काही खेळाडूंनी असे काही विक्रम केले जे नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहतील. यामध्ये जिम लेकर, एव्हर्टन वीक्स, क्लाईड वॉलकॉट यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

१२ खेळाडूंनी एकत्र केले पदार्पण..

या सामन्यात १२ खेळाडूंनी एकत्र पदार्पण केले होते. मात्र हा सामना बरोबरीत सुटला होता. ज्या १२ खेळाडूंनी या सामन्यात पदार्पण केले होते. त्यापैकी जिम लेकर हे एकमेव खेळाडू होते,ज्यांना आपली छाप सोडण्यास यश आले होते. जिम लेकर यांनी पहिल्या डावात १०३ धावा खर्च करत ७ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात २ गडी बाद केले होते. अशाप्रकारे या सामन्यात त्यांनी ९ गडी बाद केले होते.

वेस्टइंडिजच्या तर इंग्लंडच्या खेळाडूंनी केले पदार्पण..

एकाच सामन्यात १२ खेळाडूंनी पदार्पण केले होते. मात्र हे एकाच संघातील खेळाडू नव्हते. इंग्लंड संघाकडून ५ तर वेस्टइंडीजच्या ७ खेळाडूंनी पदार्पण केले होते. वेस्टइंडीज संघासाठी बार्कले गॅस्किन, एव्हर्टन वीक्स, क्लाईड वॉलकॉट, रॉबर्ट क्रिस्तियानी, जॉन गोडार्ड, विल्फ फर्ग्युसन आणि प्रायर जोन्स यांनी पदार्पण केले. तर जिम लेकर, विन्स्टन प्लेस, डेनिस ब्रूक्स, जेराल्ड स्मिथसन आणि मॉरिस ट्रेमलेट यांनी इंग्लंडसाठी पदार्पण केले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required