या खास विक्रमांमुळे सुरेश रैनाला मिळाला Mr.IPL चा टॅग...

भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज सुरेश रैनाने ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय राम राम केले होते. आता २ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ३५ व्या वर्षी त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आता तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा तसेच आयपीएल स्पर्धेत देखील खेळताना दिसून येणार नाहीये. आपण जेव्हा आयपीएल स्पर्धेचा उल्लेख करतो तेव्हा मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. मात्र सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल का म्हणतात? हे माहितेय का? नाही ना ? चला तर मग जाणून घेऊया.

असा झाला सुरेश रैना 'मिस्टर आयपीएल'

आयपीएल स्पर्धा सुरू होऊन १५ हंगाम झाले आहेत. यादरम्यान जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र सुरेश रैनालाच मिस्टर आयपीएलचा टॅग का मिळाला. असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल. याचं साधं सरळ उत्तर म्हणजे, सुरेश रैनाची आयपीएल स्पर्धेतील जोरदार कामगिरी. त्याने २००८ पासून ते २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले नव्हते.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम..

सुरेश रैना विस्फोटक फलंदाजासह एक उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम हा सुरेश रैनाच्या नावे आहे. सुरेश रैनाने २०५ सामन्यांमध्ये १०९ झेल टिपले आहेत. 

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा..

सुरेश रैनाच्या नावे आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांमध्ये ७१४ धावा केल्या आहेत. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. 

आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा..

आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही सुरेश रैनाच्या नावावर आहे. जो अजूनपर्यंत कोणालाही मोडता आला नाहीये. रैनाने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये २४९ धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वाधिक धावा..

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे. मात्र आपण जेव्हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलतो,तेव्हा सुरेश रैना अव्वल स्थानी आहे. त्याने या संघासाठी ४६८७ धावा केल्या आहेत. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा फलंदाज..

सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वाधिक ३४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे. 

सुरेश रैनाने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटला राम राम केले आहे. मात्र तो जगभरातील टी -२० लीग स्पर्धा तसेच लेजेंड्स लीग स्पर्धा खेळताना दिसून येऊ शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required