computer

फूड डिलिव्हरी ड्रोनवर कधी कावळ्यांनी केलेला हल्ला पाहिला आहे?? पाहाच मग आता!!

अनेक ठिकाणी फूड डिलिव्हरी किंवा इतर गोष्टींची डिलिव्हरी करायची असल्यास ड्रोनला प्राधान्य दिले जात आहे. पण हे असे ड्रोनच्या साहाय्याने डिलिव्हरी करणे ऑस्ट्रेलियात एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे.

आकाश तसे बघायला गेले पक्षांचा 'इलाका' असतो. आकाशात उडणारे ड्रोन एकप्रकारे त्यांच्या इलाख्यात अतिक्रमण करत असतात. ऑस्ट्रेलियातील कावळ्यांना याचा चांगलाच राग आला आणि त्यांनी थेट या फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर हल्ला चढवला.

ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे बेन रोबर्ट्स नावाचे गृहस्थ ऑर्डर केलेल्या जेवणाची वाट बघत होते. त्यांना जेव्हा त्यांची ऑर्डर घेऊन येणाऱ्या ड्रोनवर झालेला हल्ला बघितला तेव्हा त्यांनी लागलीच ती घटना कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ वायरल व्हायला वेळ लागला नाही.

 

फूड डिलिव्हरी घेऊन जाणाऱ्या ड्रोनवर कावळ्याने हल्ला चढवला. त्यानंतर त्यातून कसेबसे ते ड्रोन निसटले आणि ऑर्डर डिलिव्हर केली. यानंतर सुसाट ड्रोन निघून गेले. कंपनीला मात्र या घटनेनंतर आपले डिलिव्हरी ऑपरेशन्स थांबवावे लागले आहेत.

अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत की अनेक पक्षांचा आकाशात एरिया असतो आणि त्यात दुसऱ्या पक्षांनी ढवळाढवळ केलेली त्यांना चालत नाही. हे ड्रोन देखील त्यांना पक्षाप्रमाणे वाटले असेल आणि त्यातूनच हा हल्ला झाला असेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required