'दिवाळीची सफाई'वाले मीम्स पाहिले का? यातलं कोणतं कारण तुम्ही द्यायचात तेही सांगून टाका!!
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! दिवाळीच्या चाहूलीनेच सर्वच आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. या वर्षी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी हा आपल्याकडे सर्वात मोठा सण! त्यामुळे घरात गृहिणींची तयारीची लगबग सुरू होते. दिवाळीच्या आधी टिव्हीवर 'उठा उठा दिवाळी आली' ही जाहिरात जितकी लक्ष वेधून घेते, तितक्याच घरात आईच्या सफाईबाबतच्या सूचनाही येतात. वर्षभर साफसफाई होत असतेच, पण दिवाळीच्या साफसफाईचे महत्व सर्वात जास्त असते. ती एक परंपरा असते. एक मोठा सोहळा, ज्यात सर्वांनी हातभार लावण अपेक्षित असतं. आणि खरी गंमत तिथूनच सुरू होते.
घरकामात हातभार लावल्यावर कोण किती दमतो, किंवा स्वच्छता मोहीम टाळायला कोण काय कारणं देतो याची चढाओढ सुरू होते. या स्वच्छता मोहिमेत सोशल मीडियावर काही खास आलं नाही तर कसं होणार? नेटिझन्सनी त्यांचे 'दिवाळीची सफाई' किस्से यावर वेगवेगळ्या मीम्स आले आहेत. हे जितके विनोदी आहेत, तितकेच अगदी जवळचे वाटणारेही आहेत. आई आणि तिला मदत किंवा टाळाटाळ करणारी मुलं अशी गमतीदार मिम्स यात आहेत. यातले तुम्हाला कोणते मीम सर्वात जास्त आवडले?
तुमच्या घरात या साफसफाईच्या दिवसांत काय गमतीदार किस्से घडतात ते जरूर कमेंट करून सांगा.
शीतल दरंदळे




