ब्राझीलमध्ये आदिवासी माकडं कशी पकडतात?
आज धुळवडीचा दिवस ,तुम्ही जरा जास्तच बिझी असाला म्हणून आज मोठ्या लेखांऐवजी बोभाटा आज छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे.
तर वाचा पहिली गोष्ट !
ब्राझीलमध्ये आदिवासी माकडं कशी पकडतात हे तुम्ही कधी ऐकलंय का? . . .
थांबा ,आम्ही सांगतोच आहे.
ते एका बाटलीत चणे-शेंगदाणे ठेवतात आणि बाटली झाडाला बांधतात.
माकड बाटलीत हात घालून मुठभर दाणे घेते.परंतु बाटलीची मान अशी असते अरुंद असते की माकड आपल्या मुठीसकट हात मागे घेऊ शकत नाही.
तुम्हाला वाटेल थोड्या प्रयत्नानंतर माकड हात मोकळा करून पळून जाईल, नाही का?
पण ते कधीच होत नाही.
त्या चण्याफुटाण्याचा लोभ इतका असतो आहे की माकड कधीही हातातला माल सोडत नाही आणि शेवटी पकडलं जातं !सांगायची गोष्ट इतकीच आहे की लोभ धोकादायक गोष्ट आहे.जर तुम्ही लोभाला चिकटून बसलात तर आज नाही उद्या पकडले जालच !




