हॉरर फिल्म बघताना ६५ वर्षीय माणसाचा मृत्यू !

हॉरर सिनेमे बघून बरेच जण घाबरतात. त्यात जर सिनेमा रात्री बघत असाल तर मात्र जपूनच. अशाच एका रात्री हॉरर सिनेमा ‘The Conjuring 2’ बघताना एका 65 वर्षीय माणसाचा थेटरातच मृत्यू झाल्याची घटना तिरुवन्नमलय, तामिळनाडू मध्ये घडली आहे. सिनेमाचा शेवट पहाताना अचानक या वृद्ध माणसाच्या छातीत दुखू लागले. थिएटरमधल्या माणसांनी Ambulance बोलावली पण त्यापूर्वीच माणसाचा मृत्यू झाला होता. ‘The Conjuring 2’ हा हॉरर सिनेमा असून त्याचा दुसरा भाग नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

मृत्यूचं खरं कारण अजून माहित नसलं तरी प्रत्यक्षदर्शी माणसांकडून सिनेमा पाहूनच मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे. जर खरंच सिनेमा पाहून मृत्यू झाला असेल तर सिनेमाहॉल बाहेर एक पाटी कायमची लावावी लागेल “कमजोर दिल वाले दूर रहे”!!

सबस्क्राईब करा

* indicates required