computer

हे येडं भलतंच शहाणं निघालं !

ही गोष्ट आहे एका अमेरिकन सैनीकाची, अमेरिकन नौसेनेत काम करणार्‍या  डग्लस ब्रेंट नावाच्या तरुण सैनीकाची ! 
डग्लस ब्रेंटचे जहाज व्हिएटनामच्या आसपास असताना तो जहाजावरून फेकला गेला. पाण्यात पडल्यावर त्यानं स्वतःचा जीव तर वाचवला पण किनार्‍यावर पोहचल्यावर त्याला व्हिएटमनामच्या सैनीकांनी अटक केली. त्या दरम्यान अमेरिकेचे व्हिएटनामशी युध्द जोरात चालू होते. हा सैनीक एखादा कमांडो असावा त्यांचा समज झाला.कैद केल्यावर व्हिएटनामी सैन्याच्या अधिकार्‍यांनी त्याला तुरुंगात टाकलं. त्याची चौकशी सुरु झाली. युध्दकैद्याची चौकशी म्हणजे जीव जाईस्तो छळ होणार याची ब्रेंटला कल्पना होती. आता या छळातून वाचायचा एक मस्त उपाय त्यानं केला. तो उपाय म्हणजे त्यानी त्याच्या चेहेर्‍यावरचे हावभाव बावळटासारखे केले.नुसतेच हावभाव नाही तर त्याचं वागणं पण त्यानं तस्संच बदललं. विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे तो वेडगळ हसून उत्तर द्यायचा. समजणारच नाहीत असे चुकीचे इंग्रजी शब्द बोलायचा.नर्सरीमधल्या पोराला शोभतील अशा कविता - बडबडगीतं म्हणायचा. थोड्याच दिवसात डग्लस ब्रेंटला सगळेच 'ते येडं' म्हणायला लागले. बरेच महिने तो एकच बडबडगीत गायचा - ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म - हिय्या हिया हो ! दिवसभर हेच गाणं म्हटल्यावर सगळ्यांचीच खात्री पटली की हे 'येडंच ' आहे. कैदेतली तीन वर्षं असंच सोंग  आणि सतत एकच कविता ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म - हिय्या हिया हो !
 

बावळटाचा आव आणून त्यानं जीव तर वाचवलाच पण ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म - हिय्या हिया हो ! या कवितेच्या माध्यमातून त्याने व्हिएटनामच्या ताब्यात असलेल्या पण अमेरिकेच्या यादीत ' गहाळ' असलेल्या २५०+  युध्दकैद्यांची नावं पाठ केली होती.

उदाहरणार्थ  Old McSmith had a farm
E—I—E—I—O
And on that farm he had a John
E—I—E—I—O
With a John-John here
And a John-John there
Here a John, there a John
Everywhere a John-John

साहजिकच तो अमेरिकेत पोचल्यावर ही यादी अमेरिकन सरकारला मिळाली आणि त्यांची सगळ्यांची सुटका झाली ! वेष असावा बावळा पण अंतरी असाव्या नाना कळा हे खरंच आहे

सबस्क्राईब करा

* indicates required